Prithvi Shaw Viral Video : भारतीय क्रिकेट चाहत्यांना आता वेध लागले आहेत ते आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेचे. स्पर्धेतील सर्व दहा संघांनी रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जारी केली आहे. रिलीज झालेले खेळाडू आता लिलावासाठी उपलब्ध असून येत्या 19 डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. यासाठी हजाराहून अधिक खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं आहे. या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा खेळाडू पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw) सराव करतानाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून क्रिकेट चाहते अवाक झाले आहेत.
पृथ्वी शॉचा व्हिडिओ व्हायरल
टीम इंडियातून बाहेर असलेला मुंबईचा युवा फलंदाजी पृथ्वी शॉ सध्या आयीएलच्या नव्या हंगामासाठी जरोदार सराव करताना दिसतोय. पृथ्वी सराव करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात तो नेट प्रॅक्टिस करताना दिसत आहे, पण हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.
24 वर्षांचा पृथ्वी शॉ आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) प्रतिनिधीत्व करतो. दिल्लीच्या रिटेन खेळाडूंच्या यादीत पृथ्वीचंही नाव आहे. त्यामुळे नव्या हंगामात पृथ्वी दिल्लीकडूनच खेळताना दिसणार आहे, यासाठी त्याने सरावही सुरु केला आहे. पण त्याचा फिटनेस पाहून लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत पृथ्वीचं वजन प्रचंड वाढलेलं दिसत आहे. यावरुन क्रिकेट चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. पृथ्वी शॉचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याच्या वाढलेल्या वजनावर लोकांनी त्याची खिल्ली उडवली आहे. एका चाहत्याने त्याला फॅटमॅन असं म्हटंलय. तर एका चाहत्याने म्हटलंय अवघ्या 24 व्या वर्षात एखादा अॅथलीट इतका अनफिट कसा असू शकतो?
Prithvi Shaw’s latest Instagram Story.#CricketTwitter pic.twitter.com/vL934JjE3f
— Ishan Joshi (@ishanjoshii) December 7, 2023
दोन वर्षांपासून संघाबाहेर
पृथ्वी शॉ गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध तो कोलंबोत भारतासाठी शेवटचा टी20 सामना खेळला होता. 2018 साली राजकोटमध्ये वेस्टइंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पम केलं. भारतासाठी तो आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळला असून यात त्याने 5 सामन्यात 339 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तर भारतासाठी सहा एकदिवसीय सामने खेळला असून यात त्याने 189 धावा केल्यात. एका आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातही पृथ्वीने भारताचं प्रतिनिधित्व केलं. पण या सामन्यात तो खातंही खोलू शकला नाही.
आयपीएल कारकिर्द
पृथ्वी शॉने 2018 मध्ये आयपीएलमध्ये खेळायला सुरुवात केली. त्यानंतर गेल्या सहा वर्षात तो आयपीएलचे 71 सामने खेळला आहे. यात त्याने 1694 धावा केल्यात. 99 ही त्याची सर्वोतम धावसंख्या आहे. 13 वेळा त्याने अर्धशतकी खेळी केली आहे.