मुंबई : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशभरामध्ये कडक पावलं उचलली जात आहेत. मुंबईमध्ये असलेलं बीसीसीआयचं मुख्यालयही मंगळवारपासून बंद करण्यात येणार आहे. बीसीसीआयने कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करायला सांगितलं आहे.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पुढचे आदेश येईपर्यंत बीसीसीआयने क्रिकेट स्पर्धा रद्द केल्या आहेत. जागतिक क्रिकेटमधली सगळ्यात मोठी लीग असलेली आयपीएलही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमुळे वानखेडे स्टेडियममध्ये असलेलं बीसीसीआयचं मुख्यालय बंद करण्यात येत असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली आहे. आयपीएलशिवाय इराणी ट्रॉफी आणि महिला चॅलेंजर ट्रॉफी या स्पर्धाही कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.