'या' दिग्गज खेळाडूने टेस्ट क्रिकेटला केलं अलविदा

टी-२० क्रिकेटमधील एका स्टार बॅट्समनने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 10, 2018, 04:08 PM IST
'या' दिग्गज खेळाडूने टेस्ट क्रिकेटला केलं अलविदा  title=
File Photo

नवी दिल्ली : टी-२० क्रिकेटमधील एका स्टार बॅट्समनने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर

आयसीसी रँकिंगमध्ये टी-२० क्रिकेटचा नंबर वन बॅट्समन कॉलिन मुनरो याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. न्यूझीलंडचा हा स्टार बॅट्समन आता केवळ टी-२० आणि वन-डे मॅचेस खेळणार आहे.

अव्वल क्रमांक गाठला

क्रिकेटच्या लहान फॉरमॅटमध्ये कॉलिन मुनरो याला सर्वात चांगला खेळाडू मानलं जातं. यामुळेच टी-२० क्रिकेटमध्ये आयसीसी रँकिंगमध्ये त्याने अव्वल क्रमांक गाठला आहे. मात्र, आता ३० वर्षांच्या वयातच त्याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

मुनरोने आपली शेवटची टेस्ट मॅच २०१३ मध्ये न्यूझीलंडमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळली होती. कॉलिन मुनरोचं आगामी लक्ष्य टी-२० वर्ल्ड कप खेळणं असून त्यासाठी त्याने तयारी सुरु केली आहे.

अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर

मुनरोने टी-२० क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसोबत खेळण्यात आलेल्या टी-२० ट्रायसीरिज दरम्यानही मुनरोने धडाकेबाज बॅटिंग केली.

टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरी मुनरो टी-२०, वन-डे, ब्लॅकॅप्स आणि ऑकलँड अॅशेजसाठी खेळत राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.

२० पेक्षा कमी बॉल्समध्ये ३ हाफ सेंच्युरी बनवणारा एकमेव खेळाडू

कॉलिन मुनरोने टी-२० क्रिकेटमध्ये एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. लहान फॉरमॅटमध्ये २० पेक्षा कमी बॉल्समध्ये तीन हाफ सेंच्युरी करणारा तो एकमेव खेळाडू बनला आहे. मुनरोने टी-२० क्रिकेटमध्ये २० पेक्षा कमी बॉल्समध्ये ३ हाफ सेंच्युरी केल्या आहेत.

२० पेक्षा कमी बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी 

  • २०१६ साली श्रीलंकेविरोधात १४ बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी
  • २०१८ साली वेस्टइंडिज विरोधात १८ बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी
  • २०१८ साली इंग्लंड विरोधात १८ बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी