निवृत्तीवर बोलला क्रिस गेल

 वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेलची भारताविरूद्ध झालेल्या एकमेव टी-२० मध्ये संघात पुनरागमन झाले. गेल एका वर्षांनंतर वेस्ट इंडिजच्या जर्सीमध्ये दिसला. गेल वेस्ट इंडिजकडून एप्रिल २०१६ मध्ये मैदानात उतरला होता. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 11, 2017, 04:00 PM IST
 निवृत्तीवर बोलला क्रिस गेल  title=

एन्टिंगा :  वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेलची भारताविरूद्ध झालेल्या एकमेव टी-२० मध्ये संघात पुनरागमन झाले. गेल एका वर्षांनंतर वेस्ट इंडिजच्या जर्सीमध्ये दिसला. गेल वेस्ट इंडिजकडून एप्रिल २०१६ मध्ये मैदानात उतरला होता. 

टी-२० मध्ये पुनरागमन झालेल्या गेलने आपल्या निवृत्तीवरही तो बोलला.  टी-२० आणि ५० षटकांच्या वर्ल्ड कपपर्यंत मला खेळायचे आहे.  ५० षटकांचा वर्ल्ड कप २०१९ मध्ये आहे आणि २०१२ मध्य टी-२० वर्ल्ड कप आहेत. 

आपल्या निवृत्तीवर गेल म्हटला, हे माझ्यावर असते तर मी कधीची निवृत्ती घेतली असती. पण माझ्या फॅन्सला वाटते की मी क्रिकेटला आताच रामराम ठोकू नये.  वर्ल्ड कपपर्यंत खेळण्यासाठी मी माझ्या फिटनेटवर लक्ष केंद्रीत करत आहे.