मुंबई : कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा चेन्नई सुपरकिग्ज संघ लीग सामन्यातून बाहेर पडलाय. त्यामुळे आता सर्वंच खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. त्यात आता एक धोनीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत धोनी झारखंडमध्ये इलेक्शन ड्यूटी करताना दिसतोय. आता तो खरा धोनी आहे ? की व्हायरल फोटोतला व्यक्ती कोणी दुसराच आहे ? हे आपण शोधणार आहोत.
धोनी मूळचा झारखंडची राजधानी रांचीचा आहे. सध्या झारखंडमध्ये पंचायत निवडणुका सूरू आहेत. त्यामुळे निवडणूकीची कामे जोरात सूरू आहे. असंच निवडणूकीचं काम करताना धोनी दिसून आला आहे. सोशल मीडियावर या संबंधित एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनी दिसत आहे आणि चाहते याला धोनी दी म्हणत आहेत.
फोटो मागचं संपूर्ण सत्य
एक व्हायरल झालेला फोटो पाहून झारखंडमध्ये सुरू असलेल्या पंचायत निवडणुकांशी धोनीचे (एमएस धोनी) नाव जोडले गेले आहे. वास्तविक, रांचीमध्ये निवडणूक ड्युटी दरम्यान, लोकांनी एका व्यक्तीला एमएस धोनी समजले. धोनीसाऱखी दिसणारी ही व्यक्ती विवेक कुमार आहे. जो सीसीएलच्या एका विभागात सहाय्यक व्यवस्थापक आहे. तो निवडणूक कर्तव्यात व्यस्त असून मतमोजणी केंद्रावर कर्तव्य बजावत आहेत. विवेक कुमार यांना तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उभे केले आहे. त्याचा चेहरा हूबेहूब एमएस धोनीसारखा फोटोतून वाटतोय. त्यामुळे तो धोनी असल्याचे बोलले जात होते.
धोनीची आयपीएल कामगिरी
एमएस धोनीने 14 सामन्यात 33.14 च्या सरासरीने 232 धावा केल्या. या मोसमात त्याने 1 अर्धशतकही झळकावले.