'चक दे..' मधला कोच ठरला खऱ्या आयुष्यातील व्हिलन! Paris Olympics मध्ये टीम इंडियाबरोबर नेमकं घडलं तरी काय?

Indian Hockey Team Paris Olympics 2024 : शाहरुख खानचा 'चक दे इंडिया' या चित्रपटातील ऑस्ट्रेलिया टीमचा कोच तुम्हाला आठवतो का? कॅमेऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवून ऐनवेळी रणनीती ठरवणारा हा कोच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण आज हाच कोच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमसाठी खऱ्या आयुष्यातील व्हिलन ठरलाय. त्यामुळे 6 ऑगस्टच्या सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाला 16 ऐवजी 15 खेळाडूंसोबत मैदानात उतराव लागणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Aug 6, 2024, 12:27 PM IST
'चक दे..' मधला कोच ठरला खऱ्या आयुष्यातील व्हिलन! Paris Olympics मध्ये टीम इंडियाबरोबर नेमकं घडलं तरी काय?  title=
chak de india shahrukh khan movie Australia coach joshua burt became a villain in real life Indian Hockey Team Paris Olympics 2024

Indian Hockey Team Paris Olympics 2024 : सध्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिकचा (Paris Olympics 2024) महाकुंभ भरलाय. पॅरिसमध्ये ऑलिम्पिकमध्ये इंडिया हॉकी टीमने सेमीफाइनलमध्ये (indian hockey semi final match) धडक मारलीय. टीम इंडियाने क्वार्टर फाइनलमध्ये ब्रिटेनचा पराभव केला होता. टीम इंडियाने शूटआटऊ आणि फक्त 11 जणांच्या खेळाडूंसोबत हा विजय मिळवला होता. पण आता सेमीफाइनल मॅचपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. स्टार बचावपटू अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी घालण्यात आलीय. (chak de india shahrukh khan movie Australia coach joshua burt became a villain in real life Indian Hockey Team Paris Olympics 2024 )

'चक दे..' मधला कोच ठरला खऱ्या आयुष्यातील व्हिलन! 

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, बॉलिवूडमधील शाहरुख खानचा चक दे इंडियामधील ऑस्ट्रेलियाचा कोच हा हॉकी टीम इंडियासाठी व्हिलेन ठरलाय. तुम्हाला चित्रपटातील ऑस्ट्रेलियाचा कोच आठवतो का? त्या अभिनेत्याचा नाव जोशुआ बर्ट असून तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, तो सध्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतोय. जोशुआ हर्ट हा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अधिकाऱ्यांमध्ये आहे. त्याचा एका निर्णयामुळे भारतीय हॉकी संघाला मोठा धक्का बसलाय. 

नेमकं काय झालं?

रविवारी ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या क्वार्टर फाइनलमध्ये भारताचा नंबर वन डिफेंडर अमित रोहिदासला रेड कार्ड मिळालं होतं. या कार्डमुळे तो संपूर्ण सामन्याला मुकला होता. एवढंच नाही तर रेड कार्ड मिळाल्यानंतर रोहिदासवर एका सामन्याच्या बंदीचा धोका असल्याच सांगण्यात आलं होतं. पण हा निर्णय टूर्नामेंट संचालक घेणार होते. बस मग या टूर्नामेंट संचालकांमध्ये जोशुआ हर्ट देखील आहे. त्यांनी रोहिदासवर एका सामन्याची बंदी घातली. टीम इंडिया आता 16 ऐवजी 15 खेळाडूंसह सेमीफाइनलचा सामना खेळणार आहे. 

यापूर्वीही जोशुआ यांच्यामुळे टीम इंडियाला बसलाय धक्का 

जोशुआ हर्टने यापूर्वीच टीम इंडियाला 2011 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात वादग्रस्त सामना असाच काहीसा निर्णय घेतला होता. या सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी भांडले होते. या घटनेनंतर टूर्नामेंट डायरेक्टर ग्रॅहम नेपियर आणि जोशुआ हर्ट यांनी भारतीय टीममधील 5 जणांना निलंबित केलं होतं. यामध्ये तीन खेळाडूंशिवाय व्यवस्थापक आणि सहाय्यक प्रशिक्षक होते. भारतीय मिडफिल्डर गुरबाज सिंग, गुरविंदर सिंग चंडी आणि तुषार खांडकर यांच्यावर प्रत्येकी पाच सामन्यांची बंदी घालण्यात आली होती.