Sara Tendulkar: सारा तेंडुलकर हिला रक्षाबंधनाआधी अर्जुनकडून ही खास भेट, चाहते म्हणाले, क्या बात है...

Sara Tendulkar: सारा तेंडुलकर हिला तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर याने रक्षाबंधनापूर्वी एक खास भेट दिली आहे, ज्याचा फोटो सारा हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केला आहे.

Updated: Aug 10, 2022, 01:56 PM IST
Sara Tendulkar: सारा तेंडुलकर हिला रक्षाबंधनाआधी अर्जुनकडून ही खास भेट, चाहते म्हणाले, क्या बात है...  title=

मुंबई : Sara Tendulkar: सारा तेंडुलकर हिला तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर याने रक्षाबंधनापूर्वी एक खास भेट दिली आहे, ज्याचा फोटो सारा हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची मुलगी सारा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसते. तिने एक फोटो शेअर केला आहे. त्याचीच जास्त चर्चा सुरु झाली आहे. रक्षाबंधनआधी साराने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. रक्षाबंधनापूर्वीच सारा तेंडुलकरला तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरने गिफ्ट दिले आहे. साराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याचा खुलासा केला आहे. 

सारा तेंडुलकर हिला ही खास भेट  

रक्षाबंधनापूर्वी अर्जुन तेंडुलकर याने सारा तेंडुलकर हिला गिफ्ट दिले आहे. राखीच्या या सुंदर भेटवस्तूसाठी साराने तिचा भाऊ अर्जुनचेही आभार मानले आहेत. साराला अर्जुनकडून भेट म्हणून एक हँडबॅग मिळाली आहे. साराने त्याचा फोटो पोस्ट केला आहे. ही बॅग साराच्या खांद्यावर लटकलेली आहे. त्याचबरोबर लखनवी कुर्तीमध्ये सारा खूपच सुंदर दिसत आहे. सारा तेंडुलकर हिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'राखीपूर्वी भेट दिल्याबद्दल माझा धाकटा भाऊ अर्जुनला धन्यवाद.' 

सारा सोशल मीडियावर सक्रिय  

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर त्याचे 2.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. साराने या वर्षी मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे आणि ती बॉलिवूडमध्येही पदार्पण करु शकते, अशी चर्चा आहे. सारा तेंडुलकरने अलीकडेच एका कपड्यांच्या ब्रँडसाठी मॉडेलिंग केले होते. त्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. अर्जुनने दिलेल्या गिफ्टसोबतचा फोटो सारा तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. चाहते यावरवर कमेंट्स करत आहेत. एका यूजरने हे मस्तच आणि छान म्हटले आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले आहे, क्या बाद है.

 शुभमन गिलसोबत नाव चर्चेत

अलीकडे सारा तेंडुलकर आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्या डेटींगची बरीच चर्चा होत आहे. गिलने काही दिवसांपूर्वी दावा केला होता की तो सिंगल आहे. गिलने इंस्टाग्रामवर लोकांसोबत प्रश्न उत्तराचे एक सेशन घेतले. यावेळी त्यांनी आपण सिंगल असण्याबद्दल सांगितले होते.