Dwayne Bravo Pushpa Walk | क्रिकेटच्या मैदानात पुष्पाचा फीवर, ब्राव्होची पायातून 'चप्पल' सटकली आणि ...

मैदानात नेहमीच गंगनम स्टाईलमध्ये डान्स करणाऱ्या ड्वेन ब्राव्होलाही पुष्पा वॉक (Dwayne Bravo Pushpa Walk) करण्याचा मोह आवरता आला नाही.   

Updated: Jan 26, 2022, 07:41 PM IST
 Dwayne Bravo Pushpa Walk | क्रिकेटच्या मैदानात पुष्पाचा फीवर, ब्राव्होची पायातून 'चप्पल' सटकली आणि ... title=

मुंबई : वेस्टइंडिजचा माजी ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्हो मैदानात नेहमीच हटके सेलिब्रेशन करत असतो. ब्राव्हो त्याच्या हटके अंदाजासाठी ओळखला जातो. ब्राव्हो मैदानात नेहमीच सेलिब्रेशन करण्यासाठी निमित्त शोधत असतो. सध्या पुष्पा या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळतेय. पुष्पा फिव्हरपासून कोणही स्वत:ला रोखू शकत नाहीये. (bpl allrounder dwayne Bravo famous pushpa walk after taking wickets during  bangladesh premier league against comilla victorians) 

मैदानात नेहमीच गंगनम स्टाईलमध्ये डान्स करणाऱ्या ड्वेन ब्राव्होलाही पुष्पा वॉक (Dwayne Bravo Pushpa Walk) करण्याचा मोह आवरता आला नाही. ब्राव्होने विकेट घेतल्यानंतर पुष्पा वॉक केला. ब्राव्होचा हा व्हीडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. 

ब्राव्होने कोमिला विक्टोरियंस विरुद्धच्या सामन्यात विकेट घेतल्यानंतर 'पुष्पा वॉक' केला. ब्राव्होने मैदानात केला हा व्हीडिओ जोरात व्हायरल झालाय. तसेच या व्हीडिओवर अनेक कमेंट्स ही केल्या जात आहेत. 

ब्राव्होने या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. या जोरावर फॉर्च्यून बोरिशालने कोमिया विक्टोरियाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 158 धावांवर रोखलं. मात्र यानंतरही ब्राव्होच्या टीमचा 63 धावांनी पराभव झाला. फॉर्च्यून बोरिशालचा 95 धावांवरच गाशा गुंडाळला.    

क्रिकेटपटूंवर पुष्पा फिव्हर

दरम्यान क्रिकेटपटूंवरही पुष्पाचा फिव्हर पाहायला मिळतोय. ब्राव्होच्या आधी ऑस्ट्रेलियाचा स्टार ओपनर डेव्हिड वॉर्नर, टीम इंडियाचा हार्दिक पंड्या या खेळाडूंनीही पुष्पामधील डॉयलॉगवर लिपसिंक व्हीडिओ केलेत.