ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात होणार 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री, बीसीसीआय संघात बदल करणार?

बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या 18 सदस्यीय भारतीय संघात मोहम्मद शमीचा सहभाग नसला तरी तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही.  

पुजा पवार | Updated: Oct 26, 2024, 02:58 PM IST
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात होणार 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री, बीसीसीआय संघात बदल करणार? title=
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS Team India Squad : 22 नोव्हेंबर पासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पार पडणार आहे. या अंतर्गत दोन्ही संघांमध्ये 5 सामान्यांची टेस्ट सीरिज पार पडणार असून यासाठी 25 ऑक्टोबर रोजी टीम इंडियाची (Team India ) घोषणा झाली. मात्र यात दुखापतीच्या कारणामुळे टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या 18 सदस्यीय भारतीय संघात मोहम्मद शमीचा सहभाग नसला तरी तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही.  

अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायनलनंतर दुखापतीच्या कारणामुळे क्रिकेटच्या मैदानावर दिसला नाही. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो टीम इंडियाचा भाग असेल अशी चर्चा होती. दुखापतीतून सावरत असलेल्या शमीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी असली तरी ती पूर्णपणे संपलेली नाही. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद शमीचा भारतीय टेस्ट संघात पुनरागमन करण्याचा अंतिम निर्णय हा रणजी ट्रॉफीतील त्याचा परफॉर्मन्स पाहून घेतला जाईल. रणजी ट्रॉफीमध्ये शमी बंगालकडून २ सामने खेळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सामन्यांमध्ये त्याचा परफॉर्मन्स उत्तम राहिला तर शमी भारतीय संघात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बेंगळुरूमध्ये कर्नाटकविरुद्ध बंगाल यांच्या चौथ्या फेरीच्या सामन्यात शमी खेळू शकतो.

हेही वाचा : धोनी IPL 2025 मध्ये खेळणार की नाही? माहीने स्वतः खुलासा करत दिली मोठी अपडेट

रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार शमी : 

रणजी ट्रॉफीमध्ये बंगाल संघाचे प्रशिक्षक लक्ष्मी रतन शुक्ला यांच्या सांगण्यानुसार शमी केरळविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. परंतु कर्नाटकविरुद्धच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यासाठी आणि मध्य प्रदेशविरुद्धच्या चौथ्या फेरीच्या सामन्यासाठी तो संघात सामील होऊ शकतो. 

रोहित शर्मा शमीबद्दल काय म्हणाला होता? 

2023 वनडे वर्ल्ड कपनंतर मोहम्मद शमीच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यातून रिकव्हर होऊन काही महिन्यांनी  बंगळुरू येथील एनसीएमध्ये राहून त्याने प्रॅक्टिसला सुरुवात सुद्धा केली मात्र पुन्हा त्याला दुखापत झाली. बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिजनंतर रोहित शर्माने घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याला शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दिसणार का याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी रोहितने सांगितले होते की, "प्रामाणिकपणे बोलू तर ऑस्ट्रेलिया सीरिजसाठी त्यांची (मोहम्मद शमी) निवड होणे थोडे कठीण आहे. त्यांना अजून एक दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्यांच्या गुडघ्याला सूज आली होती. तो रिकव्हर होता होता त्यांची तब्येत पुन्हा खराब झाली त्यामुळे त्यांना पुन्हा सुरुवात करावी लागेल. ते डॉक्टर आणि फिजियो सोबत एनसीएमध्ये (नॅशनल क्रिकेट अकॅडमी, बंगळुरू) येथे आहेत. आम्ही अनफिट शमीला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाऊ इच्छित नाही. आम्ही आशा करतो की त्याने 100 टक्के बरे व्हावे". 

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ : 

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकिपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.