याला म्हणतात श्रीमंती! हेलिकॉप्टरमधून मैदानात उतरला डेव्हिड वॉर्नर; 'हे' होतं कारण

David Warner : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर हेलिकॉप्टरने थेट मैदानावर उतरला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. वॉर्नर थेट मैदानावर उतरल्याने अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 12, 2024, 02:27 PM IST
याला म्हणतात श्रीमंती! हेलिकॉप्टरमधून मैदानात उतरला डेव्हिड वॉर्नर; 'हे' होतं कारण title=

David Warner : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या फार चर्चेत आहे. डेव्हिड वॉर्नरने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. शेवटच्या कसोटी सामन्याच्या काही तास आधीच, ऑस्ट्रेलियन दिग्गज डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय फॉर्मेटमधूनही निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता डेव्हिड वॉर्नर बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसत आहे. मात्र या सगळ्यापेक्षा डेव्हिड वॉर्नरच्या एन्ट्रीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसत आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला डेव्हिड वॉर्नर सिडनी थंडर आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील बीबीएल सामन्यात खेळण्यासाठी शुक्रवारी हेलिकॉप्टरने सिडनी क्रिकेट मैदानावर उतरला आहे. डेव्हिड वॉर्नर हंटर व्हॅलीमध्ये त्याच्या भावाच्या लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर थेट सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हेलिकॉप्टरने पोहोचला आहे. सिडनी थंडरकडून खेळण्यासाठी डेव्हिड वॉर्नर हेलिकॉप्टरने मैदानावर पोहोचला होता. वॉर्नरच्या या एन्ट्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डेव्हिड वॉर्नर बिग बॅश लीग सामना खेळण्यासाठी हेलिकॉप्टरने मैदानावर पोहोचला होता. भावाच्या लग्नात सहभागी झाल्यानंतर वॉर्नर हेलिकॉप्टरने मैदानावर पोहोचला होता. त्याचे हेलिकॉप्टर सिडनी क्रिकेट मैदानावर उतरलं. वॉर्नर हेलिकॉप्टरमधूनच मैदानावर उतरला आणि थेट सिडनी थंडरच्या डगआऊमध्ये गेला. शुक्रवारी थंडर्सचा सामना सिडनी सिक्सर्सशी होणार आहे. डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळल्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली होती. ऑस्ट्रेलियाचा हा सामना सिडनीमध्येच होता. या मैदानावर इंग्रजीत 'थँक्स डेव्ही' असे लिहिले होते. शुक्रवारी वॉर्नरचे हेलिकॉप्टरसुद्धा 'थँक्स डेव्ही'जवळ उतरले.

दरम्यान, वॉर्नर एससीजीच्या शेजारी असलेल्या अलियान्झ स्टेडियमवर उतरणार हे आधी ठरले होते. पण त्यानंतर त्याचे हेलिकॉप्टर एससीजीच्या आउटफिल्डवर उतरवण्यात आले. यावेळी वॉर्नरचा सिडनी थंडरचा संघ सहकारी गुरिंदर संधू याने थंडरसाठी येऊन खेळण्याच्या वचनबद्धतेबद्दल वॉर्नरचे कौतुक केले.

डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आत टी-20 विश्वचषकानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पूर्णपणे अलविदा करणार आहे. मात्र, तो देशांतर्गत आणि फ्रेंचायझी क्रिकेट खेळत राहणार आहे. त्याने यावर्षी सिडनी थंडर्स संघासोबत 2 वर्षांचा करार केला आहे. त्यामुळे पुढील वर्षीही तो याच संघासोबत बीबीएल खेळताना दिसणार आहे.