मुंबई: देशात कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या आटेचा फटका आय़पीएलला बसला. 4 मे रोजी उर्वरित 31 सामने स्थगित झाले होते. मात्र हे सामने पुन्हा रिशेड्युल करण्यात आले आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान हे सामने पुन्हा खेळवले जाणार आहेत. या सामन्यांमध्ये स्टार फलंदाज सहभागी होणार नाही मात्र भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजमध्ये खेळणार असल्यानं आता टीम इंडियाची डोकेदुखी वाढणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना 18 ते 22 जून रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिज 4 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार असून इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियाला विजय मिळवण्याचं तगडं आव्हान असणार आहे.
इंग्लंड संघाला वर्ल्ड कप मिळवून देणारा स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्स भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजमध्ये खेळणार असल्याची माहिती मिळाली आहे. आयपीएल सामन्यादरम्यान बेन स्टोक्सच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याच्या बोटावर सर्जरी करण्यात आली आहे. त्यानंतर तो काही दिवस मैदानापासून दूर होता. मात्र आता भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजमध्ये खेळणार असल्याची माहिती मिळाल्यानं टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र 14 जून रोजी होणाऱ्या टी 20 सामन्यामध्ये खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टी 20 मध्ये जर तो खेळला तर तीन वर्षातील त्याचा हा पहिलाच सामना असेल.