मुंबई : भारतीय क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे (Shivam Dubey) आणि त्याची गर्लफ्रेंड अंजुम खानची लव्हस्टोरी खुप चर्चेत आली आहे. दोघांनी गेल्याच वर्षी 16 जुलै 2021 रोजी लगीनगाठ बांधली होती.या लग्नातील एक विशेष बाब म्हणजे, शिवम दुबे हा हिंदू आहे, तर पत्नी अंजुम खान मुस्लिम होती.त्यामुळे शिवम आणि अंजुमच्या लव्हस्टोरीनेही (Shivam Dubey love story) बरीच चर्चा रंगली होता.दरम्यान आज आम्ही तुम्हाला शिवम दुबे आधी कोणत्या क्रिकेटर्सने मुस्लिम तरूणींशी लग्न केले होत याची माहिती देणार आहोत.
शिवम दुबेने (Shivam Dubey) 16 जुलै 2021 रोजी त्याची गर्लफ्रेंड अंजुम खानसोबत लग्न केले होते. शिवमने मुस्लिम तरूणी अंजुम खानसोबत हिंदू रितीरिवाजांशिवाय मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न केले होते. लग्नानंतर शिवम दुबेने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत याबाबतची माहिती दिली होती.
शिवम दुबेच्या (Shivam Dubey) आधी भारताचा माजी क्रिकेटर अजित आगरकरने (Ajit Agarkar) देखील धर्माच्या भिंती तोडत मुस्लिम तरूणीसी लग्न केलं होतं. अजित आकरकरने फातिमा या मुस्लिम तरूणीशी लग्न केलं होतं. अजित आगरकर आणि फातिमा यांची पहिली भेट 1999 मध्ये झाली होती. त्यावेळी अजित आगरकर आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करत होते. या दरम्यान दोघांमध्ये प्रेम जुळलं होतं. या प्रेम प्रकरणानंतर दोघांनी लग्न केलं होतं.
भारताचा माजी खेळाडू मनोज प्रभाकरही (Manoj Prabhakar) धर्माच्या भिंती तोडून मुस्लिम तरुणी फरहीनशी लग्न केले होते. दोघांच्या लव्हस्टोरीने त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. मनोज प्रभाकर हा त्याच्या काळातील उत्कृष्ट खेळाडू होता. या अष्टपैलू खेळाडूने एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
दरम्यान हे होते भारतीय क्रिकेटर्स ज्यांनी धर्माच्या भिंती तोडत मुस्लिम तरूणीशी लग्न केलं होतं.