चोर निघाला ऑस्ट्रेलियाचा हा अंपायर

जगातील सर्वात वादग्रस्त अंपायर, डेरेक हेअर, पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते क्रिकेटमुळे नाही तर चोरीसाठी चर्चेत आले आहेत. ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्र सिडनी मॉर्निंगच्या अहवालानुसार हेराल्ड हे चोरीमते दोषी सापडले आहेत. कोर्टाने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा नाही दिली. पण 18 महिने चांगले वर्तन करण्याचा बॉन्ड लिहून घेतला. सोबतच चोरी केलेले पैसे परत करण्यास सांगितले आहे.

Updated: Oct 24, 2017, 03:34 PM IST
चोर निघाला ऑस्ट्रेलियाचा हा अंपायर title=

नवी दिल्ली : जगातील सर्वात वादग्रस्त अंपायर, डेरेक हेअर, पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते क्रिकेटमुळे नाही तर चोरीसाठी चर्चेत आले आहेत. ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्र सिडनी मॉर्निंगच्या अहवालानुसार हेराल्ड हे चोरीमते दोषी सापडले आहेत. कोर्टाने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा नाही दिली. पण 18 महिने चांगले वर्तन करण्याचा बॉन्ड लिहून घेतला. सोबतच चोरी केलेले पैसे परत करण्यास सांगितले आहे.

78 कसोटी सामन्यात पंच म्हणून डेरेक हेअरने अंपारिंग केली आहे. 9005.75 रुपये त्यांनी एका दारूच्या दुकानातून चोरले होते. अंपायर म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते या दुकानावर काम करत होते. त्यानंतर 25 फेब्रुवारी ते 28 एप्रिल या कालावधीत त्यांना संधी मिळेल तशी पैशांची चोरी केली होती.

अंपायर डेरेक हेअर यांना जुगाराचं व्यसन लागलं होतं. त्यामुळे ते त्यांनी पैसे चोरण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्सचे राहणारे डॅरेल हेअर यांनी 17 वर्ष अंपायरिंग केली. हेअर यांनी 138 एकदिवसीय सामने, 78 कसोटी आणि 6 टी -20 सामन्यांमध्ये अंपायरिंग केली आहे.