एशियन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाची दणक्यात एंट्री, साऊथ कोरियावर केली मात

सोमवारी पार पडलेल्या सेमी फायनलमध्ये भारताचा सामना साऊथ कोरिया सोबत होता. भारताने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत.

पुजा पवार | Updated: Sep 16, 2024, 06:21 PM IST
एशियन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाची दणक्यात एंट्री, साऊथ कोरियावर केली मात  title=
(Photo Credit : Social Media)

Asian Championship Hockey 2024 : भारतीय हॉकी टीमने चीनमध्ये सुरु असलेल्या एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 च्या फायनलमध्ये धडक दिली आहे. सोमवारी पार पडलेल्या सेमी फायनलमध्ये भारताचा सामना साऊथ कोरिया सोबत होता. या सामन्यात भारताने 4-1 ने आघाडी घेऊन विजय मिळवला. भारताने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत. आता फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना हा यजमान चीन सोबत होणार आहे. 

एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारत आणि साऊथ कोरिया यांच्यात सामना रंगला होता. यावेळी भारतीय टीमकडून 13  व्या मिनिटाला उत्तम सिंहने गोल केला. त्यानंतर कोरियाला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र भारतीय डिफेंडने त्यांना गोल करू दिला नाही. यात पहिल्या क्वाटरचा गेम संपला. त्यानंतर सामन्याच्या 18 व्या मिनिटाला भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने गोल केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये शेवटच्या सेकंदाला पेनल्टी कॉर्नरद्वारे हरमनप्रीतने पुन्हा एक गोल केला. ज्यामुळे तिसऱ्या क्वार्टर अंती भारत 4-1 ने पुढे होते. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने या स्पर्धेत आतापर्यंत तब्बल 7 गोल केले आहेत.

हेही वाचा : युवराज सिंहने बेस्ट प्लेईंग 11 मध्ये धोनीला केलं इग्नोर, थालाचे फॅन्स भडकले, पाहा VIDEO

 भारतीय टीमने यंदाच्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत एकूण 6 पैकी 6 सामने जिंकले आहेत. भारतीय टीम यावर्षी डिफेंडिंग चॅम्पियन सुद्धा असून मागील वर्षी त्यांनी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. सध्या टीम इंडिया एशियन चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्येही पहिल्या स्थानावर आहेत. सेमी फायनलपूर्वी झालेल्या सामन्यात भारताने शनिवारी पाकिस्तानला सुद्धा धूळ चारली होती. शनिवारी भारताने एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफीच्या सामन्यात पाकिस्तानला 2-1 ने मात दिली.