Asia cup : पावसाने खेळ बिघडवला तरी पाकिस्तान फायनलमध्ये, टीम इंडियाचं काय होणार? पाहा कसं आहे गणित

Asia Cup 2023: एशिय कप स्पर्धेत आता सुपर-4 ची चुरस सुरु झाली आहे. भारतासह यजमान पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशने सुपर-4 मध्ये एन्ट्री केली आहे. पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा पराभव करत दणक्यात सुरुवात केली आहे.

राजीव कासले | Updated: Sep 7, 2023, 08:29 PM IST
Asia cup : पावसाने खेळ बिघडवला तरी पाकिस्तान फायनलमध्ये,  टीम इंडियाचं काय होणार? पाहा कसं आहे गणित title=

Asia Cup 2023: एशिया कप 2023 स्पर्धेत सहभागी झालेल्या सहा संघांपैकी अफगाणिस्तान (Afghanistan) आणि नेपाळ (Nepal) संघ साखळीतच बाहेर पडले आहेत. तर भारतासह (India) यजमान पाकिस्तान (Pakistan), श्रीलंका (Sri Lanka) आणि बांगलादेशने (Bangladesh) सुपर-4 मध्ये (Super-4) एन्ट्री केली आहे. या स्पर्धेत एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत, यापैकी 7 सामने खेळले गेले आहेत. तर सहा सामने खेळले जाणार आहेत. आता सुपर-4 चा थरार सुरु झाला असून यजमान पाकिस्तानने बांगलादेशचा सात विकेटने पराभव करत दमदार सुरुवात केली आहे. सुपर-4मध्ये पाच सामने श्रीलंकेतील कोलंबोत होणार आहेत. यात अंतिम सामन्याचाही समावेश आहे. 

कोलंबोत पावसाचं सावट
पण कोलंबोत पुढच्या पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशात पावसामुळे सुपर-4 चे सामने रद्द झाले तर कोणते दोन संघ अंतिम फेरीत पोहोचणार याबाबत क्रिकेटचाहत्यांना प्रश्न पडला आहे. 

अंतिम फेरीचं असं असेल गणित
पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर-4 मधला आपला पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात 2 पॉईंट जमा झाले आहेत. पाकिस्तानचे सुपर-4 मधले आणखी दोन सामने बाकी आहेत. पण पावसामुळे हे दोनही सामने रद्द झाले तर त्यांना रद्द झालेल्या दोन सामन्यांचे दोन पॉईंट मिळतील. म्हणजे पाकिस्तानच्या खात्यात 4 पॉईंट जमा होतील. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. बांगलादेश क्रिकेट संघ पाहिला सामना हरला आहे, म्हणजे त्यांची पाटी कोरी आहे. पावसामुळे बांगलादेशचे पुढचे दोनही सामने रद्द झाले तरी बांगलादेशच्या खात्यात केवळ दोन पॉईंट जमा होतीव. त्यामुळे अंतिम फेरीत बांगलादेशची शक्यता कमीच आहे. 

भारत-श्रीलंकेला समान संधी
सुपर-4 मध्य टीम इंडिया आणि श्रीलंका आपल्या तीनपैकी एकही सामने खेळलेले नाहीत. पावसामुळे सुपर-4 चे तीनही सामने रद्द झाले तर भारत-श्रीलंकेच्या खात्यात प्रत्येकी 3 पॉईंट जमा होतील. अशा परिस्थितीत टॉस उडवून अँतिम फेरीत कोणता संघ प्रवेश करणार याचा निर्णय घेतला जाईल. कारण सामनेच न खेळल्याने रनरेटवचाही विचार करता येणार नाही. असं झालंच तर टीम इंडिया अंतिम फेरीत पोहचणार की नाही हे केवळ नशीबावर अबलंबून असेल. अंतिम सामन्यातही पाऊस पडला तर दोन्ही संघांना विभागून विजयी घोषित केलं जाईल. 

एशिया कपचा इतिहास
एशिया कपच्या इतिहासात भारताने सर्वाधिक 7 वेळा जेतेपद पटकावलं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंका असून लंकेने 6 वेळा एशिया कपवर नाव कोरलं आहे. पाकिस्तानला आतापर्यंत केवळ 2 वेळा एशिया कपचं जेतेपद पटकावता आलं आहे. पाकिस्तानने शेवटचं 2012 मध्ये म्हणजे तेरा वर्षांपूर्वी एशिया कप जिंकला होता.