Shweta Shinde : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेच्या साताऱ्याच्या घरी दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. यावेळी त्या चोरांनी घरात असलेले सोन्याचे दागिने चोरले आहेत. तर श्वेताच्या घरी तब्बल 10 तोळं सोन होतं ते त्या चोरांनी लंपास केलं आहे. त्याशिवाय त्यांनी घरात असलेली काही रोख रक्कम देखील चोरी केल्याचे यावेळी समोर आले आहे. चोरी केल्यानंतर चोरांनी घरातील थेट घरातलं कपाटही जाळलं. ही घटना 3 जून सोमवारी घडली. या प्रकरणी श्वेता शिंदेनं सातारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याशिवाय पोलिस या चोरांना शोधून काढतील हा विश्वास देखील तिनं दर्शवला आहे.
साताऱ्यातील पिरवाडी या ठिकाणी श्वेता शिंदे ही तिच्या आईसोबत राहते. तर कामाच्या निमित्तानं ती मुंबईला आली होती. नेमकं त्याच वेळी चोरांनी संधी साधली. याविषयी श्वेतानं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. श्वेता यावेळी म्हणाली की 'सोमवारी 3 जून रोजी रात्री माझ्या घरी दरोडा पडला. साधारणत: 10 तोळं सोनं आणि काही पैसे चोरले आहेत. नक्की किती मालमत्ता गेली ते माहीत नाही. पण, जे काही लक्षात होतं ते आईनं सांगितलं. नशिबानं त्यावेळी आई घरात नव्हती. त्यामुळे तिला काही झालं नाही. आताच मी DCP साहेबांना भेटले. साताऱ्यातील पोलीस यंत्रणा सशक्त आहे. त्यामुळे नक्कीच यावर कारवाई होईल, असा मला विश्वास आहे आणि अशी माझी सकारात्मक भावना आहे'.
हेही वाचा : '...तर अयोध्येत परिस्थिती वेगळी असती', महाभारतच्या भीष्म पितामहानं भाजपला झापलं
श्वेताच्या कामाविषयी बोलायचं झाले तर ती अभिनेत्री असण्यासोबत एक निर्माती देखील आहे. ती 'लागिर झालं जी' या मालिकेची निर्माती होती. तिची ही मालिका चांगलीच गाजली आहे. तर सध्या या झी मराठीवर असलेल्या 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेची देखील ती निर्माती आहे. तर लवकरच श्वेताची 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या मालिकेत या अभिनेता नितीश चव्हाण व अभिनेत्री दिशा परदेशी प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.आता मागच्या दोन गाजलेल्या मालिकांप्रमाणे श्वेता शिंदेची ही मालिका देखील तितकीच गाजेल अशी तिच्या चाहत्यांना आशा आहे.