ठरलं! पाकिस्तानविरुद्ध 'हा' खेळाडू करणार पदार्पण, भारताची अशी असेल प्लेईंग XI

एशिया कप स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2 सप्टेंबरला आपला पहिला सामना खेळेल. श्रीलंकेच्या कँडी स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान आमने सामने असतील. या सामन्यासाठी टीम इंडियाने खास रणनिती आखली आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 24, 2023, 07:59 PM IST
ठरलं! पाकिस्तानविरुद्ध 'हा' खेळाडू करणार पदार्पण, भारताची अशी असेल प्लेईंग XI title=

India Playing-11 vs Pakistan in Asia Cup 2023: भारतीय संघाचा आयर्लंड (Ireland Tour) दौरा संपला आहे. टीम इंडियाने (Team India) आयरीश टीमला त्यांच्याच घरात पराभूत करत तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. आता रोहित शर्माच्या  (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सज्ज झालाय एशिया कप स्पर्धेसाठी (Asia Cup 2023). आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियातल चार खेळाडूच एशिया कप स्पर्धेत खेळणार आहेत. यात प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह, अष्टपैलू तिलक वर्मा (Tilak Verma), विकेटकिपर संजू सॅमसन आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा समावेश आहे. 

राहुल-श्रेयसला आराम?
एशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होईल. तर भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना 2 सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी रंगणार आहे. हा सामना श्रीलंकेतल्या कँडी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तगडी प्लेईंग इलेव्हन मैदानात उतरेल. पहिल्या सामन्यात अष्टपैलू तिलक वर्माला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. असं झालं तर तिलक वर्माचा हा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील पदार्पणाचा सामना ठरेल. एशिया कप स्पर्धेसाठी श्रेयस अय्यर आणि के एल राहुलची निवड करण्यात आली आहे. पण हे दोघंही दुखापतग्रस्त आहेत. 

नंबर चारवर तिलक वर्मा?
पहिल्या सामन्याआधी के एल राहुलला बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे. तर श्रेयस अय्यरच्या खेळण्यावर अद्याप साशंकता आहे. त्यामुळे नंबर चार वर तिलक वर्माला संधी मिळू शकते. टी20 सामन्यात तिलक वर्माने स्वत:ला सिद्ध केलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत तिलक वर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या मालितेल्या चार सामन्यात तिलकने चौथ्या क्रमाकांवरच फलंदाजी केल होती, तर 173 धावा त्याने फटकावल्या होत्या. त्याची कामगिरी पाहता कर्णधार रोहित शर्मा त्याला चार नंबरलाच संधी देऊ शकतो. 

विकेटकिपर म्हणून ईशान किशनला संधी मिळणार हे जवळपास निश्चत आहे. तर सलामीची जबाबदारी कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर असेल. तिसऱ्या क्रमांकवर विराट कोहली, तर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांचा नंबर असेल. 

वेगवान गोलंदाजीची धुरा
टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यावर टीम इंडियाच्या वेगावन गोलंदाजीची धुरा असेल. तर त्यांच्या जोडीला मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते. फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजा संघात निश्चित आहे. त्याच्या जोडीला अक्षर पटेल किंवा कुलदीप यादवला संघात घेतलं जाईल. 

पाकिस्तानविरुद्ध संभाव्य प्लेइंग-11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर/तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

एशिया कपसाठी भारतीय संघ

ओपनर: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल.
मिडिल ऑर्डर: विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव
विकेटकीपर: ईशान किशन, केएल राहुल, संजू सॅमसन (स्टॅंडबाय).
ऑलराउंडर: हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल,  तिलक वर्मा
वेगवान गेंदबाज: जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, प्रसिद्ध कृष्णा
स्पिनर: कुलदीप यादव