Ind vs SL: पाऊस नाही पडला तर पडणार 'विक्रमांचा पाऊस'! रोहित, विराटबरोबर कुलदीपही रांगेत

Asia Cup 2023 Ind vs SL Records Await: भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यावर पावसाचं सावट असलं तरी या सामन्यामध्ये अनेक विक्रम मोडले जाणार आहेत. हे विक्रम कोणते हे पाहूयात तसेच वातावरणाची स्थिती काय आहे पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 12, 2023, 02:23 PM IST
Ind vs SL: पाऊस नाही पडला तर पडणार 'विक्रमांचा पाऊस'! रोहित, विराटबरोबर कुलदीपही रांगेत title=
भारत आज सुपर-4 मधील आपला दुसरा सामना खेळणार आहे

Asia Cup 2023 Ind vs SL Records Await: भारत आणि श्रीलंकेदरम्यान आद आशिया चषक स्पर्धेतील 'सुपर-4' सामना खेळवला जाणार आहे. अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो अंतिम फेरीत स्थान मिळवले असं मानलं जात आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. या सामन्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीबरोबरच कुलदीप यादवही अनोख्या विक्रमांना गवसणी घालू शकतात. हे विक्रम कोणते आणि हवामानाची स्थिती काय आहे यावर नजर टाकूयात...

हवामान काय म्हणतंय?

वेदर डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार आज कोलंबोमध्ये सामन्याच्या कालावधीदरम्यान पावसाची शक्यता कमी आहे. पाऊस पडण्याची शक्यता अगदी 15 टक्के इतकी आहे. सायंकाळी 7 वाजच्या सुमारास विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडू शकतो. त्यानंतर रात्री 10 वाजताही पाऊस पडू शकतो. मात्र पाऊल अल्प कालावधीसाठी असेल असंही सांगण्यात आलं आहे. पावसामुळे सामन्याला मोठा फटका बसण्याची शक्यता कमी आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रोहित करणार अनोखा विक्रम

भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा एका अनोख्या विक्रमापासून केवळ 1 षटकार दूर आहे. आशिया चषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज होण्याची संधी रोहित शर्माकडे आहे. त्याला यासाठी केवळ एक षटकार मारायचा आहे. सध्या रोहित शर्मा आणि शाहीद आफ्रिदी हे प्रत्येकी 26 षटकांसहीत पहिल्या स्थानी आहेत. त्यामुळे रोहितने एक षटकार मारला तरी तो शाहीद आफ्रिदीच्या पुढे जाईल.

रोहित आणि विराट जुना विक्रम मोडणार

यंदाच्या आशिया चषक स्पर्धेमध्ये अजून रोहित शर्मा आणि विराट कोलहीला एकत्र फलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाही. मात्र या दोघांना आज एकत्र खेळण्याची संधी मिळाल्यास ते एक अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर करुन घेऊ शकतात. दोघांनी एकूण 85 वेळा एकत्र खेळताना भारतासाठी 4998 धावा केल्या आहेत. त्यांनी यात आज 2 धावांची भर टाकली तर 5000 धावांची पार्टनरशीप करणारे खेळाडू ठरतील. असं झालं तर ते वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज गार्डन ग्रिंडी आणि डेस्मंड हॅनिस यांचा विक्रम मोडतील. त्यांनी 97 खेळींमध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला होता. 

विराट झळकावणार का 48 वं शतक?

विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध दमदार शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या 49 एकदिवसीय शतकांच्या विक्रमाच्या दिशेनं एक पाऊल टाकलं आहे. या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी त्याला 2 शतकांची गरज आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये झळकावलेलं नाबाद शतक हे त्याच्या कारकिर्दीमधील 47 वं शतक ठरलं. आज तो 48 वं शतक झळकावणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. प्रेमदासावर झालेल्या मागील 4 सामन्यांमध्ये त्याने शतकं झळकावली आहेत. 

कुलदीप यादव थेट आगरकरला मागे टाकणार?

भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून देण्यात 5 गडी बाद करत मोलाचं योगदान देणारा फिरकीपटू कुलदीप यादवही आज अनिल कुंबळेचा विक्रम मोडू शकतो. 150 धावांचा टप्पा सर्वात कमी डावांमध्ये ओलांडणारा भारतीय फिरकीपटू होण्याचा बहुमान कुलदीपला मिळू शकतो. कुंबळेने 106 डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. यापूर्वी मोहम्मद शमीने हा विक्रम 80 डावांमध्ये केला आहे. आज कुलदीप सध्याचे मुख्य निवडसमिती प्रमुख अजित आगारकर यांचा विक्रम मोडू शकतो. आगरकरने 97 डावांमध्ये 150 बळी घेतलो होते. कुलदीप आज त्याच्या कारकिर्दीमधील 88 वा सामना खेळणार आहे. सर्वात वेगाने 150 बळींचा टप्पा गाठाणाऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा मायकल स्टार्क हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 77 डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. कुलदीपला आज 4 विकेट्स घेण्याची गरज आहे. सध्या त्याच्या नावावर 146 विकेट्स आहेत.