पंत की कार्तिक कोण BEST विकेटकीपर, Asia Cup आधी रोहित शर्माने वाचा काय दिलं उत्तर

ऋषभ पंत की दिनेश कार्तिक, एशिया कप स्पर्धेत कोणाला मिळणार संधी?

Updated: Aug 23, 2022, 03:57 PM IST
पंत की कार्तिक कोण BEST विकेटकीपर, Asia Cup आधी रोहित शर्माने वाचा काय दिलं उत्तर title=

Asia Cup 2022 : झिम्बाव्बेला (zimbabwe) व्हाईटवॉश देणारी टीम इंडिया (Team India) जबरदस्त फॉर्मात आहे. आता क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती एशिया कप स्पर्धेची (Asia Cup 2022). एशिया कप स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना रंगणार आहे तो पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Pakistan). टी-20 वर्ल्ड कपमधला बदला घेण्यासाठी टीम इंडियाही सज्ज झाली आहे.

रोहित शर्माने (Rohit Sharma) भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून टीम इंडियाच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघात अशा एका खेळाडूला संधी मिळाली आहे, ज्याची टीम इंडियातील कारकिर्द जवळपास संपल्यात जमा होती. 

या खेळाडूचं नाव आहे दिनेश कार्तिक (Dinesh Kartik), तब्बल तीन वर्षांनंतर भारतीय टी-20 संघात दिनेश कार्तिकचं पुनरागमन झालं, त्याच्या एन्ट्रीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण दिनेश कार्तिकने आपल्या कामगिरीच्या जोरावर आपलं पुनरागमन यशस्वी करुन दाखवलं. याचं पूर्ण श्रेय जातं ते रोहित शर्माला.

असं असलं तरी ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) असण्यामुळे दिनेश कार्तिकला संघात फारशी संधी मिळू शकलेली नाही. दुसरीकडे क्रिकेटप्रेमींकडूनही दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतच्या कामगिरीची नेहमतीच तुलना केली जाते.

याचसंदर्भात रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आला. दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यात सर्वश्रेष्ठ विकेटकिपर, फलंदाज कोण आहे? यावर रोहित शर्माने दिलेल्या उत्तराने क्रिकेट चाहत्यांचा मनं जिंकली.

पंत आणि कार्तिकमध्ये सर्वश्रेष्ठ कोण?
ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यात सर्वश्रेष्ठ कोण यावर बोलताना रोहित शर्माने अगदी सामंजस्याने उत्तर दिलं. दोनही खेळाडूंची शैली वेगळी आहे त्या दोघांची तुलना करणं योग्य नसल्याचं रोहितने म्हटलं आहे. 

ऋषभ पंतची विकेटकिपिंगची शैली उत्तम आहे आणि तो एक धडाकेबाज फलंदाज आहे. समोर कितीही दिग्गज गोलंदाज असला तरी पंत त्याच अंदाजात खेळतो.

तर दुसरीकडे दिनेश कार्तिककडे मोठा अनुभव आहे. फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, आणि अनेक सामन्यात त्याने फिनिशर म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे. याशिवाय विकेटकिपिंगमध्येही तो सर्वोत्तम आहे. दोनही खेळाडूंचं भारतीय संघात वेगळं स्थान आहे. त्यामुळे दोघांची तुलना करणं योग्य नसल्याचं रोहितने म्हटलं आहे.