Arjun Tendulkar : अर्जुनने टाकला असा खतरनाक यॉर्कर की...; सचिन तेंडुलकरला मिळालं खास बर्थडे गिफ्ट

या सामन्यामध्ये अर्जुनने त्याच्या आयपीएलच्या करियरमधील दुसरी आणि होमग्राऊंडवर पहिली विकेट पटकावली आहे. ही विकेट घेत अर्जुनने वडिलांना म्हणजेच सचिन तेंडुलकरला एक खास गिफ्ट दिलं आहे. 

Updated: Apr 22, 2023, 11:05 PM IST
Arjun Tendulkar : अर्जुनने टाकला असा खतरनाक यॉर्कर की...; सचिन तेंडुलकरला मिळालं खास बर्थडे गिफ्ट title=

Arjun Tendulkar : मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यामध्ये सामना रंगला. हा सामना मुंबईच्या खेळाडूंसाठी महत्त्वाचा सामना आहे, कारण हे स्टेडियम त्यांचं होमग्राऊंड आहे. त्यामुळे अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) देखील त्याच्या होमग्राऊंडवर आज सामना खेळतोय. या सामन्यामध्ये त्याने त्याच्या आयपीएलच्या करियरमधील दुसरी आणि होमग्राऊंडवर पहिली विकेट पटकावली आहे. ही विकेट घेत अर्जुनने वडिलांना म्हणजेच सचिन तेंडुलकरला एक खास गिफ्ट दिलं आहे. 

अर्जुनचा प्लेईंग 11 मध्ये समावेश 

आजच्या सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी रोहितने प्लेईंग 11 मध्ये अर्जुन तेंडुलकरचाही समावेश केला होता. या सामन्यात अर्जुनने त्याच्या होमग्राऊंडमध्ये पहिली विकेट काढली आहे. 

24 एप्रिल रोजी सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. आजचा सामना वानखेडेवर असल्याने सचिनचा वाढदिवस आज मैदानावरच सेलिब्रेट करण्यात आला. अशातच अर्जुनने विकेट घेत सचिनला जणू वाढदिवसांचं गिफ्ट दिलंय आहे. 

अर्जुनने काढली अथर्वची विकेट

आजच्या सामन्यात अर्जुनने सुंदर यॉर्कर टाकून एक विकेट मिळवली. ही त्याची वानखेडेच्या मैदानावरील पहिली विकेट होती. त्याची ही विकेट घेतल्यानंतर सचिनवर कॅमेरा दाखवला. त्यावेळी सचिन फार खूश असल्याचं दिसत होतं. मात्र त्यानंतर अर्जुनला तिसऱ्या ओव्हरमध्ये 31 रन्सची लूट केली. 

अर्जुनच्या या यॉर्कर बॉलवर फलंदाजाच्या पॅडवर बॉल जाऊन लागला. मात्र अर्जुनने एवढा घातक यॉर्कर टाकला होता की, फलंदाज चुकला असता तर तो क्लीन बोल्ड झाला असता. अर्जुन तेंडुलकरचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील अर्जुनला यॉर्कर किंग म्हणाल.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेविड, तिलक वर्मा, अर्जुन तेंदुलकर, ऋतिक शौकीन, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, जेसन बेहरनडॉर्फ

पंजाब किंग्स: अथर्व तायदे, प्रभसिमरन सिंह, मैथ्यू शॉर्ट, लियाम लिविंगस्टोन, सॅम करण (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत सिंह भाटिया, शाहरुख खान, हरप्रीत बराड़, राहुल चाहर, अर्शदीप सिंह