KL Rahul : लखनऊच्या (Lucknow Super Giants) इकाना स्टेडियमवर आज लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यामध्ये सामना रंगला होता. गुजरातची फलंदाजी संपल्यानंतर लखनऊ हा सामना सहजरित्या जिंकेल असाच विचार प्रत्येकाने केला होता. मात्र सामन्याच्या अखेरीस याउलट घडलं आणि गुजरातने रोमांचक पद्धतीने विजय मिळवला. दरम्यान या लाजीरवाण्या पराभवानंतर लखनऊचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) बेताल वक्तव्य केलंय.
गुजरातच्या फलंदाजानी प्रथम फलंदाजी करत लखनऊला 136 रन्सचं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करत लखनऊची टीम सहज हा सामना जिंकेल अशी प्रत्येकाची अपेक्षा होती. मात्र सात 7 रन्सने लखनऊचा पराभव झाला. या पराभवाला कर्णधार केएल राहुलची संथ फलंदाजी लखनऊच्या पराभवाचं कारण ठरल्याचं म्हटलं जातंय.
दरम्यान सामना संपल्यानंतर लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार केएल राहुलने एक विचित्र विधान केलं आहे. केएल राहुल म्हणाला, मला नाही माहिती हे कसं झालं. होय, पण असं झालं आहे. मी हे सांगू शकत नाही की, नेमकी चूक कुठे झाली हे मी नाही सांगू शकत. पण आजचा सामना गमावून आम्ही आज 2 पॉईंट्स देखील गमावलेत.
केएल राहुल पुढे म्हणाला की, "आम्हाला अजून एक मोठा आणि लांब पल्ला गाठायचा आहे. आज मी अधिक फलंदाजी करण्याचा विचार करत नव्हतो. मला अजूनही माझे शॉट्स खेळायचे होते. पण त्या 2-3 ओव्हर्समध्ये नूर आणि जयंत यांनी चांगली गोलंदाजी केली."
आमच्या हातात विकेट्स होते आणि आम्हाला त्याचा फायदा घ्यायला पाहिजे होता. पण मला वाटतं की, आम्ही काही फोर मारण्याच्या संधी गमावल्या. शेवटच्या 3-4 ओव्हर्समध्ये आमच्यावर दबाव आला. मात्र त्यावेळी विरोधी टीमने चांगली गोलंदाजी केली, असंही राहुलने सांगितलं आहे.
लखनऊविरूद्ध गुजरातच्या सामन्यात शेवटची ओव्हर मोहित शर्माने फेकली. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर राहुलने 2 रन्स काढले आणि दुसऱ्या बॉलवरवर तो आऊट झाला. त्यानंतर मार्कस स्टॉइनिस तिसऱ्या बॉलवर आऊट झाला.
या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर आयुष बडोनी रनआऊट झाला. तर दीपक हुडाची विकेटही 5 व्या बॉलवर गेली. यानंतर मोहित शर्माने शेवटचा बॉल डॉट टाकला आणि मोहितने हा सामना गुजरातला जिंकवून दिला.