Ind Vs Ban : विराटच्या बॅटिंगवर Anushka Sharma फिदा, शतकानंतर दिली अशी Reaction

भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात खेळल्या जात असलेल्या शेवटच्या आणि तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताचा सलामीवीर ईशान किशनने (Ishan Kishan) वादळी द्विशतक ठोकलं. तर विराटने शतकीय (Virat Kohli 72th International Hundred)  खेळी केल्याने बांग्लादेशला अखेरच्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलंय. अखेरच्या सामन्यात भारताने बांग्लादेशला 227 धावांनी पराभूत केलं आहे.

Updated: Dec 10, 2022, 09:03 PM IST
Ind Vs Ban : विराटच्या बॅटिंगवर Anushka Sharma फिदा, शतकानंतर दिली अशी Reaction title=

Anushka Sharma reacts to Virat Kohli ODI century : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात खेळल्या जात असलेल्या शेवटच्या आणि तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताचा सलामीवीर ईशान किशनने (Ishan Kishan) वादळी द्विशतक ठोकलं. तर विराटने शतकीय (Virat Kohli 72th International Hundred)  खेळी केल्याने बांग्लादेशला अखेरच्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलंय. अखेरच्या सामन्यात भारताने बांग्लादेशला 227 धावांनी पराभूत केलं आहे.

दोन्ही फलंदाजी बांगलादेशाच्या गोलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. विराटने तब्बल 3 वर्षानंतर वनडे सामन्यात शतक जडलं आहे. कोहलीच्या या 'विराट' खेळीनंतर त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने त्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 

अनुष्काकडून विराटसाठी खास इन्स्टा पोस्ट

विराट कोहलीने तिसऱ्या वनडे सामन्यात शानदार शतक झळकावलं आहे. यामुळे त्याचे चाहतेही फार खूश झाले आहेत. कोहलीचं हे 72 वं इंटरनॅशनल शतक होतं. यानंतर अनुष्कालाही आनंद झाला असून सोशल मीडियावर तो व्यक्त केलाय. 

अनुष्काने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्याने कोहली शतक पूर्ण झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना दिसतोय. यावेळी अनुष्काने कोणतंही कॅप्शन लिहिलं नाहीये, मात्र 3 इमोजी शेअर केले आहेत.

विराटने मोडला पॉटिंगचा रेकॉर्ड

सामन्यातील शतकानंतर आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराटने 72 शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. टेस्ट क्रिकेट, टी-ट्वेंटी आणि वनडेमध्ये 72 शतक ठोकणारा विराट आता दुसरा खेळाडू बनला आहे. विराटने आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पॉटिंगचा (Ricky Ponting) रेकॉर्ड मोडला. रिकीने त्याच्या कारकीर्दीत 71 शतक ठोकले होते. त्यानंतर या सामन्यात शतक ठोकत कोहलीने विराट (Virat Kohli Breaks Ricky Ponting’s Centuries Record) कामगिरी केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) भारताचा माजी स्टार खेळाडू सचिन तेंडूलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर 100 शतकांचा रेकॉर्ड आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीने झेप घेतली. त्यानंतर रिकी पॉटिंगचा 71 शतकांसह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. त्यानंतर 63 शतकांसह कुमार संगकारा (Kumar Sangakkara) येतो.