Abrar Ahmed: पाकिस्तानचा हॅरी पॉटर स्वतःच्याच टाकलेल्या बॉलवर कंफ्यूज, विकेट कसा गेला कळलंच नाही

अबरार अहमद चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि त्याने इंग्लंडचा ओपनर बेन डकेटला क्लिन बोल्ड आऊट केलं. मात्र यावेळी फलंदाजासोबत अबरार देखील हैराण झाला

Updated: Dec 10, 2022, 08:06 PM IST
Abrar Ahmed: पाकिस्तानचा हॅरी पॉटर स्वतःच्याच टाकलेल्या बॉलवर कंफ्यूज, विकेट कसा गेला कळलंच नाही title=

Pak vs Eng: पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यामध्ये टेस्ट सिरीज सुरु आहे. रावळपिंडीमध्ये झालेला सामना इंग्लंडने (England team) जिंकला असून दुसरा सामना सध्या मुल्तानमध्ये खेळवला जातोय. या सामन्यामध्ये इंग्लंडच्या पहिल्या डावात फलंदाजांची दाणादाण उडवून देणाऱ्या अबरार अहमदची (Abrar Ahmed) सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. अशातच आता पुन्हा एकदा अबरार चर्चेत आला आहे. यावेळीही त्याचं चर्चेत येण्यामागील कारण हे गोलंदाजी आहे.

36 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर अबरार अहमद चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि त्याने इंग्लंडचा ओपनर बेन डकेटला क्लिन बोल्ड आऊट केलं. मात्र यावेळी फलंदाजासोबत अबरार देखील हैराण झाला कारण, या बॉलवर फलंदाज बोल्ड झालाच करा. स्लो, शॉर्ट आणि टर्न इन झालेल्या बॉलवर बेनने पुल करण्याचा प्रयत्न केला होता. 

नेमकं काय झालं?

बेन डकेट फार लवकर पुल शॉट खेळायला गेला. मात्र हा शॉट खेळण्यासाठी तो अपयशी ठरला. यावेळी बॉल त्याच्या बॅटच्या टोकाला लागला मात्र सोबत स्टंपही उडाले. यावेळी अबरार हळूच हसला आणि त्याच्या इतर साथीदारांसोबत आनंद व्यक्त करताना दिसला. यावेळी विकेटकीपर मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम देखील हैराण होते.

इंग्लंडच्या पहिल्या डावात अबरारची कामगिरी

अबरार अहमद याचा हा डेब्यू सामना आहे. अबरारने त्याच्या गोलंदाजीच्या जादूने इंग्रजी खेळाडूंची (England team) चांगली दाणादाण उडवली. सुरुवातीच्याच सामन्यात त्याने 7 विकेट्स (7 Wickets) घेतलेत. पहिल्याच सामन्यात पहिल्या दिवशी जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, विल जॅक्स आणि बेन स्टोक्स यांना अबरारने माघारी धाडलं. 

उत्तम गोलंदाजी करत उजव्या हाताचा लेगस्पिनर अबरार अहमदच्या नावावर एक मोठा विक्रम केलाय. 24 वर्षांच्या अबरारने टेस्टमध्ये पदार्पण करत पाचहून अधिक बळी घेणारा तो पाकिस्तानचा केवळ 13वा गोलंदाज ठरलाय. मुलतानमध्ये 16 वर्षांनंतर टेस्ट सामन्याचे आयोजन केलं गेलं असून अबरार अहमदने हा सामना पाकिस्तानसाठी संस्मरणीय ठरवलाय.

अबरार अहमदने डेब्यू इनिंगमध्ये 114 रन्स देत 7 विकेट्स काढलेत. तर बाकीचे 3 विकेट्स जाहिद महमूदने पटकावलेत. अबरारच्या या घातक गोलंदाजीपुढे इंग्लंडची टीम 281 रन्सवर ऑलआऊट झाली. पाहिलं तर अबरार अहमद डेब्यू इनिंगमध्ये 7 विकेट्स घेणारा जगातील 14 वा आणि पाकिस्तानचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी केवळ मोहम्मद नझीर आणि मोहम्मद जाहिद यांनाच ही कामगिरी जमली होती.