तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडू टीमबाहेर?

तिसऱ्या सामन्याअगोदरच टीमला एक मोठा धक्का बसला आहे. टीमचा मॅचविनर खेळाडू बाहेर होण्याची शक्यता आहे.

Updated: Feb 27, 2022, 01:46 PM IST
तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडू टीमबाहेर? title=

मुंबई : श्रीलंकेविरूद्धची टी-20 सिरीज टीम इंडियाने जिंकली. धर्मशालामध्ये झालेला दुसरा टी-20 सामना 7 विकेट्सने जिंकून टीम इंडियाने या सिरीजवर कब्जा केला. तर तिसरा सामना बाकी असून हा सामना जिंकून क्लिन स्विप देण्याचा टीम इंडिया पूर्ण प्रयत्न करणार आहे. मात्र तिसऱ्या सामन्याअगोदरच टीमला एक मोठा धक्का बसला आहे. टीमचा मॅचविनर खेळाडू बाहेर होण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाचा ओपनर फलंदाज इशान किशनला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याच्या डोक्यावर बाऊंसर आदळला होता. त्यामुळे त्याला तातडीने रूग्णालयात दाखल केलं गेलं होतं. मात्र तरीही अजून तो तिसऱ्या सामन्यात खेळणार का यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

इशानला हिमाचल प्रदेशातील कांगडा इथल्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचं स्कॅन करण्यात आलं. यानंतर त्याला नॉर्मल वॉर्डमध्ये भर्ती केलं गेलं होतं.

3.2 ओव्हरमध्ये लाहिरूने 146 किमी वेगाने एक जोरदार बाउन्सर टाकला. हा बॉल थेट इशानच्या डोक्यावर जाऊन बसला. बॉल लागताच इशान हेल्मेट काढून जागीच बसला होता. 

बॉल लागूनही फलंदाजी केली

इशानला बॉल लागल्यानंतर फिजियोने त्याची तपासणी केली. त्यानंतर इशान फलंदाजी करण्यासाठी तयार झाला. मात्र यानंतर तो मोठी खेळी खेळू शकला नाही. त्याने 15 बॉलमध्ये 16 रन्स केले.