Video : रनआऊट झाल्यानंतर बॅट्समनचं धक्कादायक कृत्य, सहकारी खेळाडूसोबत नेमकं काय झालं?

Run out Viral Video : रक्षाबंधनापासून Asia Cup 2023 सुरुवात होणार आहे. क्रिकेटप्रेमी एशिया कप स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Aug 27, 2023, 01:24 PM IST
Video : रनआऊट झाल्यानंतर बॅट्समनचं धक्कादायक कृत्य, सहकारी खेळाडूसोबत नेमकं काय झालं? title=
angry Batsman throws bat after run out Video Viral on Social media today trending now cricket news

Batsman throws bat after run out Video Viral : रक्षाबंधन 30 ऑगस्टपासून Asia Cup 2023 ला सुरुवात होणार असून टीम इंडिया  (Team India) स्पर्धेसाठी सज्ज आहे. टीम इंडिया पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तानशी खेळणार आहे. त्यामुळे सर्वत्र क्रिकेटची चर्चा होताना दिसत आहे. अशातच सोशल मीडियावर क्रिकेटचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रनआऊट झाल्यानंतर बॅट्समनचं धक्कादायक कृत्य एका खेळाडूच्या जीवावर बेतलं आहे. (angry Batsman throws bat after run out Video Viral on Social media today trending now cricket news)

आयुष्यात तुमच्या हातातून अनेक वेळा न कळत अशा गोष्टी घडतात ज्यामुळे इतरांचं आयुष्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. तसंच काहीस या बॅट्समनकडून घडलं आहे. खरं तर सोशल मीडियावर क्रिकेटच्या मैदानातील अनेक घटनेचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण हा व्हिडीओ पाहून अनेकांची झोप उडाली आहे. 

नेमकं काय झालं?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता बॅट्समन रन करण्यासाठी धावतो पण समोरील खेळाडू धाव नाही त्यामुळे तो बॅट्समन आऊट होतो. क्रिकेटमध्ये run out होणं हे काही नवीन नाही. पण run out झाल्यानंतर रागाच्या भरात बॅट्समनने जे धक्कादायक कृत्य केलं पाहून सगळ्यांच धक्का बसला आहे. 

आपण run out झालो या रागात त्याने मैदानातून जाताना हातातील बॅट ज्या गतीने फिरवली की, ती बॅट थेट त्याच्याच टीमच्या बॅट्समनला जाऊन लागली. ती बॅट इतक्या जोरात खेळाडूकडे आली की, त्याला जबर दुखापत झाल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

खरं तर हा व्हिडीओ कुठल्या मॅचचा आहे त्याबद्दल काही समजलं नाही. मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटर म्हणजे X वर हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर तो इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ जुन्या असल्याचं बोलं जातं आहे.