FIFA World Cup 2022 : फिफाची रंगत वाढलेली असतानाच ब्राझिलचा स्टार खेळाडू रुग्णालयात; कॅन्सरशी देताहेत झुंज
FIFA World Cup 2022 : फिफाची रंगत वाढलेली असतानाच ब्राझिलचा स्टार खेळाडू रुग्णालयात; कॅन्सरशी देताहेत झुंज
FIFA World Cup 2022 : ब्राझिलच्या फुटबॉल कारकिर्दीत मोलाचं योगदाना देत प्रत्येक फुटबॉल प्रेमीच्या मनात खास स्थान असणारा हा खेळाडू देतोय मृत्यूशी झुंज?
Brazil's Football Legend Pele Hospitalized : क्रिकेट विश्वचषकाची (Cricket world Cup) हवा शमत नाही तोच कतारमध्ये फुटबॉलचा ( FIFA World Cup Qatar 2022 ) महाकुंभ सुरू झाला. अर्थात कतारमध्ये मोठ्या दिमाखातस फिफा वर्ल्ड कपची सुरुवात झाली. पण, ही स्पर्धा रंगात असतानाच फुटबॉलप्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आली. ब्राझीलच्या (brazil) संघातील माजी खेळाडू आणि एक महान फुटबॉलपटू अशी जागतिक स्तरावर ओळख असणाऱ्या पेले (Pele aka Edson Arantes do Nascimento) यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या आरोग्याबाबत बऱ्याच अफवा उठण्यास सुरुवात झाल्यानंतर खुद्द मुलीनंच अधिकृत माहिती देत पेले अफवांना पूर्णविराम दिला. (pele health update )
मुलीनं दिलेल्या माहितीनुसार पेले यांना कॅन्सरचं (Cancer) निदान झालं असून, ते दैनंदिन चाचण्या आणि तपासणीसाठी रुग्णालयात गेले आहेत. नॅसिमेंटोनं ही माहिती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली. शिवाय सध्या चिंता करण्याजोगी बाब नसल्याचंही तिनं स्पष्ट केलं.
पेले यांचं वाढतं वय... (pele age)
82 वर्षीय पेले यांना अल्बर्ट आइंस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 2021 मध्येच पेले यांच्या कोलनमधून ट्यूमक काढण्यात आला होता. यानंतर ते तपासणीसाठी कायमच रुग्णालयात येताना दिसले. त्यामुळं त्यांची यावेळची रुग्णालयातील फेरीसुद्धा दैनंदिन तपासणीसाठीच असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेसुद्धा पाहा : Live सामन्यात धक्कादायक प्रकार; हातात झेंडा घेऊन 'तो' फक्त धावत राहिला...पाहा Video
'माध्यमांमध्ये माझ्या वडिलांच्या आरोग्याविषयी अनेकच चर्चा सुरु आहेत. पण ते रुग्णालयात सर्वसामान्य तपासणीसाठी गेले आहेत. इथं चिंता करण्याची कोणतीही बाब नाही' असं पेले यांच्या लेकिनं लिहिलं.
ब्राझिलला तिनदा फुटबॉल वर्ल्ड कप मिळवून देणारा जादुगार!
जागतिक स्तरावर गाजलेल्या फुटबॉल खेळात पेले यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. जगातील महान फुटबॉल खेळाडूंच्या यादीत त्यांचं नाव घेतलं जातं. तर, अनेक युवा खेळाडूंसाठी ते आदर्शस्थानी आहेत. 1958 मध्ये जेव्हा त्यांनी वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली होती, त्यावेळी त्यांचं वय अवघं 17 वर्षे इतकं होतं. (brazil player) ब्राझील हा 5 वेळा वर्ल्ड कप (World Cup 2022 ) जिंकणारा जगातील एकमेव देश असून, पेले यांचा यात मोठा वाटा आहे.
आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी संघाला 1958, 1962 आणि 1970 असा तीन वेळे वर्ल्ड कप जिंकवून दिला होता. ब्राझिलच्या संघासाठी त्यांनी 92 सामन्यांमध्ये 77 गोल केले. संपूर्ण फुटबॉल कारकिर्दीत त्यांनी 1363 सामने खेळत 1281 वेळा गोल केले. आडकेवारीवरूनच कळतंय ना, पेले यांना महान खेळाडू का म्हणतात?