Ambani Helps BCCI On IPL : अभिनेत्री राखी सावंतच्या (Rakhi Sawant) आईला कॅन्सरचं निदान झालं. त्यावेळी तिला मदत करण्यासाठी आणि कमी पैशात उपचार व्हावे यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पुढे सरसावले होते. तर नुकतंच दुसरीकडे फायनॅनशियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, अडचणीत सापडलेल्या अदानींना (Gautam Adani Group) मदत करण्यासाठी अंबानी कुटुंबियांनी मदत केल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता अंबानी थेट बीसीसीआयच्या (BCCI) मदतीला धावल्याची माहिती समोर आली आहे. (Ambani Helps BCCI On Womens IPL Auction solved the ipl problem jay shah worries latest marathi news)
बीसीसीआयला आयपीएलबाबत (IPL) एक मोठी समस्या जाणवत होती. पण अंबानी यांनी एका क्षणात सोडवली. यंदाच्या वर्षी महिलांचीही आयपीएल (Womens IPL) खेळवण्यात येणार आहे. महिलांची आयपीएल पहिल्यांदाच खेळवण्यात येणार असल्याने सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. अशातच बीसीसीआयपुढे मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला होता. त्याचं उत्तर अंबानींनी शोधलंय.
झालं असं की... महिलांच्या आयपीएल लिलावासाठी (Womens IPL Auction) बीसीसीआयला हॉटेल मिळत नव्हतं. लग्नाचा हंगाम असल्यानं बीसीसीआयला महिला आयपीएलच्या लिलावासाठी हॉटेल मिळेना झालं. त्यामुळे बीसीसीआयवर जोरदार टीका होत होती. ही बातमी जेव्हा अंबानींना कळाली. त्यावेळी अंबानींनी मोठं मन दाखवत बीसीसीआयसाठी दरवाजे उघडे केले.
आणखी वाचा - Prithvi Shaw ची 'ब्रेकअप गर्लफ्रेंड' आहे तरी कोण? Photo पाहून तुम्हीही आवाक् व्हाल!
दरम्यान, मुंबईतील वांद्रे कुर्लामधील संकुलात एक वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये (World Convention Centre) अंबानी यांनी बीसीसीआयसाठी (BCCI) जागा उपलब्ध करून दिली आहे. अंबानींच्या या दिलदारपणामुळे सांस्कृतिक केंद्रात आता महिला आयपीएलचा लिवाव होऊ शकतो. लिलाव 13 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. महिलांच्या आयपीएलला 4 मार्चला सुरुवात होईल.