Deepak Chahar Wife Fraud Case : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटरच्या पत्नीसोबत फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या फसवणूकीत तिला लाखो रूपयांचा गंडा घातला गेला आहे. क्रिकेट असोसिएशनच्या माजी अधिकाऱ्यानेच हा प्रकार केल्याची माहीती आहे. आता या प्रकरणी स्टार खेळाडूच्या (Deepak Chahar) वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत. (deepak chahar wife jaya bharadwaj fraud 10 lacs hyderabad cricket assocition fir registered)
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहरची (Deepak Chahar) पत्नी जया हिची १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या (एचसीए) माजी अधिकाऱ्याने जयाची फसवणूक केली होती. या घटनेनंतर दीपक चहरच्या वडिलांनी अधिकाऱ्याविरोधात नामनिर्देशन अहवाल दाखल केला आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात एचसीएच्या माजी अधिकाऱ्याने जया भारद्वाज (jaya bharadwaj) यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले होते. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी असलेले ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांनी जयासोबत हा करार केला होता.या डीलनुसार 7 ऑक्टोबर 2022 रोजी जया यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले होते, पण ते अद्याप परत केलेले नाहीत. इतकंच नाही तर जया यांना पैशाची मागणी करत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
या प्रकरणी आता दीपक चहरच्या (Deepak Chahar) वडिल लोकेंद्र चहर यांनी आग्रा येथील हरिपर्वत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या एफआयआरमध्ये हैदराबादच्या पारिख स्पोर्ट्सचे नाव आहे. या फर्मचे मालक ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांची नावे आहेत. आता पोलिस या प्रकरणी आरोपींवर काय कारवाई करते हे पाहावे लागणार आहे.