अजिंक्य रहाणे मुलीसोबत आजीला भेटायला

भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे सध्या कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.

Updated: Jan 8, 2020, 09:40 AM IST
अजिंक्य रहाणे मुलीसोबत आजीला भेटायला title=

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे सध्या कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. अजिंक्य रहाणे त्याची पत्नी राधिका आणि मुलगी आर्यासोबत वेळ घालवत आहे. अजिंक्य रहाणे पहिल्यांदाच मुलीला घेऊन त्याच्या आजीला भेटायला घेऊन गेला होता. आर्या आणि तिच्या पणजीची ही पहिलीच भेट होती. अजिंक्य रहाणेने हे फोटो ट्विटरवर शेयर केले आहेत. माझी आजी माझी प्रेरणा, माझी हिरो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवला, असं ट्विट रहाणेने केलं आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या टी-२० सीरिज सुरु आहे, पण गेल्या काही काळापासून अजिंक्य रहाणे भारताच्या वनडे आणि टी-२० टीमचा हिस्सा नाही. श्रीलंकेविरुद्धची टी-२० सीरिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजनंतर भारतीय टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम ५ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

न्यूझीलंड दौऱ्यात टेस्ट सीरिजआधी अजिंक्य रहाणे न्यूझीलंडमध्ये भारत-अ कडून सराव सामने खेळणार आहे. न्यूझीलंडमधल्या वातावरणाची सवय व्हावी म्हणून अजिंक्यची भारत-अ टीममध्ये निवड करण्यात आली आहे.