मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना १ जुलैपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटीव्ह आढळलो होता. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. त्यात आता रोहित नंतर आणखीण एक खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. त्यामुळे कसोटी सामन्यापूर्वीच अनेक खेळाडूंची धाकधूक वाढलीय.
रोहितप्रमाणेच इंग्लंडच्या एका खेळाडूला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बेन फॉक्स कोविड-19 पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी सॅम बिलिंग्स त्याच्या जागी यष्टिरक्षकाची जबाबदारी स्वीकारतील. आता फॉक्स भारताविरुद्धच्या शेवटच्या कसोटीतून बाहेर पडू शकतो का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बिलिंग्सचा संघात समावेश
पाठदुखीच्या तक्रारीनंतर तिसऱ्या दिवशी दुपारी फॉक्स मैदानात परतला नाही आणि नंतर लीड्समधील सांघिक हॉटेलमध्ये त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात जॉनी बेअरस्टोने यष्टिरक्षकाची भूमिका बजावली होती, मात्र उर्वरित सामन्यासाठी फॉक्सच्या जागी बिलिंग्सचा संघात समावेश करण्यात आला आहे.सध्याच्या मालिकेतील बिलिंग्स हा दुसरा पर्यायी खेळाडू आहे जो इंग्लंडकडून खेळणार आहे.
कोरोना केसेस
गेल्या एका आठवड्यात कोविड पॉझिटिव्ह आढळलेला फॉक्स हा इंग्लंड संघातील दुसरा खेळाडू आहे. फलंदाजी प्रशिक्षक मार्कस ट्रेस्कोथिक पॉझिटिव्ह आढळल्याने अंतिम कसोटीसाठी संघात सामील होऊ शकले नाहीत. ट्रेंट ब्रिज येथील दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनलाही सामन्यातून बाहेर पडावे लागले. डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, मायकेल ब्रेसवेल आणि सहाय्यक कर्मचार्यांच्या दोन सदस्यांना इंग्लंडला नेल्यानंतर चाचणी पॉझिटीव्ह आली होती.