T20 World Cup : भारताच्या पराभवावर इम्रान खानचं खोचक वक्तव्य, पहा काय म्हणाले

पाकिस्तान क्रिेकेट संघाच्या विजयानंतर पाकिस्तान मंत्र्यांचं बेताल वक्तव्य समोर आलं होतं, त्यात इम्रान खान यांनी भर टाकली आहे  

Updated: Oct 25, 2021, 10:40 PM IST
T20 World Cup : भारताच्या पराभवावर इम्रान खानचं खोचक वक्तव्य, पहा काय म्हणाले title=

रियाद : टी 20 वर्ल्ड कपच्या (ICC T20 World Cup) सुपर 12 राऊंडमध्ये पाकिस्तानने (Pakistan Cricket) टीम इंडियाचा (Team India) 10 विकेटने पराभव केला. विश्व चषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने भारतावर मात केली आहे. पाकिस्तानच्या या विजयानंतर पाकिस्तान मंत्र्यांचं बेताल वक्तव्य समोर आलं होतं. आता खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यात भर टाकली आहे. 

भारत-पाकिस्तान सामन्याचा वापर पाकिस्तानमध्ये राजकारणासाठी केला जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी आपल्या भाषणात भारतीय संघाच्या पराभवावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

'टी20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर भारताशी संबंध सुधारण्याबाबत बोलण्याची ही योग्य वेळ नाही हे मला माहीत आहे, असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. पण मी कल्पना करतो की जर आपण फक्त एका समस्येवर उपाय शोधू शकलो असतो तर तो मुद्दा काश्मीरचा असता' असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे. स्वत: एक क्रिकेटपटू राहिलेल्या इम्रान खान यांचं हे वक्तव्य आश्चर्यजनक आहे.

सौदी अरेबियाची राजधानी रियाद इथं एका कार्यक्रमात भाषण करतान इम्रान खान यांनी हे वक्तव्य केलं आहे. दुसरीकडे पराभवानंतरही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मेंटॉर एमएस धोणी पाक खेळाडूंचं अभिनंदन करतान दिसले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतानाही विराट कोहलीने पाकिस्तान संघाला शुभेच्छा दिल्या.

पाकिस्तानमध्ये कट्टरपंथी तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानच्या (TLP) समर्थकांनी लाहोर आणि इस्लामाबादसह अनेक शहरांमध्ये धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान इम्रान खान जनतेला वाऱ्यावर सोडून सौदी अरेबियात गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीवर पाकिस्तानमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे.