Maharashtra Politics 2024 : मनसेकडून विधान परिषदेसाठी अभिजीत पानसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली.. त्यानंतर आज अभिजीत पानसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीये. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र मनसेनं विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केल्यानं महायुतीमध्ये चर्चांनं उधाण आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पानसेंनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट महत्त्वाची समजली जात आहे.
मनसेकडून विधान परिषदेसाठी अभिजीत पानसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज अभिजीत पानसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र मनसेनं विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केल्यानं महायुतीमध्ये चर्चांनं उधाण आले. त्या पार्श्वभूमीवर पानसेंनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट महत्त्वाची समजली जातेय.
महायुतीतीत मित्रपक्षांची मोठी कोंडी
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेनं उमेदवार जाहीर करत महायुतीतीत मित्रपक्षांची मोठी कोंडी केलीय.. कोकण पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपचे निरंजन डावखरे आमदार म्हणून विजयी झाले होते. डावखरेही पुन्हा निवडणूक लढवायला इच्छुक आहे.. भाजपमध्येही त्यांच्याच नावाची चर्चा सुरू असताना मनसेनं परस्पर उमेदवार जाहीर करून महायुतीच्या नेत्यांसमोर मोठा पेच उभा केला. दरम्यान, विधानपरिषदेच्या या निवडणुकीत स्वतंत्र लढायचं की युती करून हे अद्याप ठरलेलं नाही, असा दावा भुजबळांनी केलाय.
दुसरीकडे मनसेचे उमेदवार अभिजीत पानसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलंय.. मनसेच्या उमेदवारीला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का? की काही वेगळ्या रणनितीची ही नांदी आहे.. असाही प्रश्न उपस्थित होतोय... तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय.. या भेटीतही कोकण पदवीधरबाबत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.
कोकण पदवीधर हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. भाजपचे निरंजन डावखरे विद्यमान आमदार आहेत. राज ठाकरेंनी उमेदवार दिल्याने भाजपची कोंडी झालीय. राज ठाकरेंना उमेदवार माघार घ्यायला कसं सांगायचं हा महायुतीसमोरचा मोठा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीला मनसेनं भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. आता कोकण पदवीधरसाठी मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन भाजप परतफेड करणार की लोकसभेतील हे मित्र विधानपरिषदेला एकमेकांसमोर उभे ठाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे..