IPL 2022 : बीसीसीआयची मोठी घोषणा, 'या' दोन नविन संघांची आयपीएलमध्ये एन्ट्री

IPL 2022 मध्ये 8 ऐवजी 10 संघ खेळताना दिसणार आहेत, याची घोषणा आज करण्यात आली

Updated: Oct 25, 2021, 07:52 PM IST
IPL 2022 : बीसीसीआयची मोठी घोषणा, 'या' दोन नविन संघांची आयपीएलमध्ये एन्ट्री title=

मुंबई : आयपीएलसाठी (IPL 2022) आजचा दिवस मोठा आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात 8 संघ खेळले होते. पण आता आयपीएल 2022 मध्ये 10 संघ खेळणार आहेत. बीसीसीआयने (BCCI) आज याबाबत मोठी घोषणा केली आहे. आयपीएलमध्ये संघ खरेदीसाठी आतापर्यंत अनेकजणांनी उत्सुकता दाखवली होती. दोन संघांसाठी लावण्यात आलेल्या सर्व बोली आज बीसीसीआयसमोर सादर झाल्या, त्यानंतर बीसीसीआय दोन फ्रँचाईझींची (two new franchises) घोषणा केली आहे. (IPL new teams, expanding the league from 8 to 10)

आयपीएल 2022 मध्ये अहमदाबाद आणि लखनऊ या दोन शहरांना पसंती देण्यात आली आहे. कॅपिटल पार्टनर्स ग्रुपकडे अहमदाबादची मालकी गेली आहे तर संजीव गोएन्का यांच्या RPGS ग्रुपला लखनऊची फ्रँचाईझी मिळाली आहे. कॅपिटल ग्रुपने अहमदाबाद संघ 5 हजार 166 कोटींन विकत घेतला, तर गोएन्का ग्रुपने लखनऊच्या संघावर सर्वाधिक 7 हजार 90 कोटी रुपयांची बोली लावली. 

आयपीएल 2022 साठी दोन संघ खरेदी करण्यासाठी जवळपास 20 हून अधिक कंपन्यांनी बोली लावली होती. अंतिम बोलीसाठी पाच ते सहा कंपन्यांची निवड करण्यात आली. विदेशी कंपन्यांनीही आयपीएलमध्ये संघ खरेदीसाठी उत्सुकता दाखवली होती. 

आयपीएलच्या दोन नविन संघांसाठी लखनऊ आणि अहमदाबाद या शहरांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या दोन शहरांव्यतिरिक्त गुवाहाटी, रांची, कटक आणि धर्मशाला या शहारांच्या नावाचीही चर्चा होती. अहमदाबादमधलं नरेंद्र मोदी स्टेडिअम आणि लखनऊचं इकाना स्टेडिअम फ्रँचाईझींची पसंती आहे. या स्टेडिअमची प्रेक्षक क्षमताही मोठी आहे.

बीसीसीआय पुढच्या वर्षी मेगा लिलावाची तयारी करतंय, यात तीन खेळाडूंचं रिटेंशन होईल, तर इतर सर्व खेळाडूंवर बोली लागेल. आयपीएल 2022 साठी 10 संघ असल्याने खेळाडूंसाठी चढा-ओढही मोठी असेल. यात भारतीय खेळाडूंना सर्वाधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे. कारण एका संघात 7 भारतीय आणि 4 परदेशी खेळाडू असणं बंधनकारक आहे. अशात भारताच्या युवा खेळाडूंना जास्त संधी मिळू शकते.