Rohit Sharma: नुकतंच भारत विरूद्ध झिम्बाब्वे सिरीज पार पडली. यानंतर आता टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी टीम इंडियाला 3 टी-20 सामने आणि 3 वनडे सामने खेळवण्यात येणार आहेत. अजून श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झालेली नाही, मात्र त्यापूर्वी सिलेक्शनसाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यापूर्वी टीम इंडियाचा नवा कोच गौतम गंभीरने रोहित शर्मासोबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा कदाचित श्रीलंका दौऱ्यावर खेळण्याची शक्यता आहे. यावेळी रोहित वनडे सिरीज खेळताना दिसण्याची शक्यता आहे. जर रोहित शर्मा श्रीलंकेच्या दौऱ्यावर खेळणार असेल तर तो कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, रोहित श्रीलंकेत वनडे सिरीज खेळण्याची शक्यता आहे. याच कारण म्हणजे पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला जास्त वनडे सामने खेळायचे नाहीत.
टी-20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद लुटतोय. T20 वर्ल्डकपनंतर तो पत्नी आणि मुलीसह इंग्लंडला फिरायला गेला होता. मात्र, रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सिरीज खेळण्याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही. लवकरच तो बीसीसीआयला त्याच्या उपलब्धतेची माहिती देणार असल्याचं म्हटलं जातंय.
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या सिलेक्शनबाबत अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली. यावेळी या बैठकीमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाहही उपस्थित होते. नवीन मुख्य प्रशिक्षक झालेल्या गौतम गंभीरने ऑनलाइन सहभाग घेतला. गंभीरने खेळाडूंच्या निवडीबाबत निवडकर्त्यांशी बरीच चर्चा केली असल्याची माहिती आहे.
रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर श्रीलंका दौऱ्यावरून परत येऊ शकतात. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. रोहित शर्माने वनडे सिरीजसाठी कमबॅक केल्यास श्रीलंका दौऱ्यावर केएल राहुलच्या खांद्यावर कर्णधारपद देण्यात येणार नाही. भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका 2 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याआधी 27 जुलैपासून टी-20 सिरीज खेळवली जाणार आहे. त्यामध्ये सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात येण्यात आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान
शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, रिंकू सिंह, कुलदीप यादव, अवेश खान, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई, ध्रुव जुरेल, वाशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, शिवम दुबे, हर्षित राणा