World Cup जिंकण्यासाठी काही पण.. टीम इंडियाच्या गुडलकसाठी 51 नारळ, 240 अगरबत्ती मागवल्या आणि...

टीम इंडियाच्या गुड लक साठी एका व्यक्तीने 51 नारळ, 240 अगरबत्ती मागवल्या आहेत. मॅच सुरु असताना नारळ फोडले जात आहेत. 

Updated: Nov 19, 2023, 07:38 PM IST
World Cup जिंकण्यासाठी काही पण.. टीम इंडियाच्या गुडलकसाठी 51 नारळ, 240 अगरबत्ती मागवल्या आणि...  title=

ODI World Cup 2023: क्रिकेट हा खेळ म्हणजे भारतीयांसाठी जीव की प्राण असा आहे.  जेव्हा टीम इंडिया वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचते तेव्हा माहौल काही औरच असतो. टीम इंडियाच्या विजयासाठी देव पाण्यात ठेवले जातात. नवस, यज्ञ अगदी सर्व प्रकारे प्रार्थना करत टीम इंडियाला चीअर अप करतात. टीम इंडियाच्या गुड लकसाठी ठाण्यातील एका व्यक्तीने Swiggy  वरुन तब्बल 51 नारळ ऑर्डर केले आहेत. Swiggy ने X वर पोस्ट टाकल्यानंतर ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीने यावर भन्नाट रिप्लाय दिला आहे. 

Swiggy Instamar वर 51 नाराळांची ऑर्डर

Swiggy ने X या सोशल मिडीयावर टाकलेल्या पोस्टवर ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीने रिप्लाय केला आहे. someone from thane just ordered 51 nariyals!!! if it’s for finals, the world cup is coming home for real..  ठाण्यातून कुणी तरी 51 नारळ ऑर्डर केले आहेत.  जर हे फायनल साठी असेल तर वर्लड कप आपल्यालाच मिळणार अशी पोस्ट Swiggy ने केली. यावर नारळ ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीने @gordonramashray नावाच्या अकाऊंटवरुन  रिप्लाय केला आहे. haan bhay yeh someone from thane bhi mai hi hoon, 51 nariyal for unreal manifestation असा रिप्लाय या वक्तीने केला आहे. सोबतच नारळांचा फोटो देखील शेअर केला आहे. फोटो मध्ये टीव्ही समोर नारळांची थाळी आणि फोडलेले काही नारळ दिसत आहेत. 

इंडियाची मॅच सुरु असताना मागवल्या होत्या 240 अगरबत्त्या

याच व्यक्तीने यापूवी इंडियाची मॅच सुरु असताना  Swiggy वरुन 240 अगरबत्त्या मागवल्या होत्या. तेव्हा देखील त्याने पेटवलेल्या अगकबत्त्यांचा फोटो शेअर केला होता. टीम इंडियाच्या गुडलक साठी या व्यक्तीने नारळ आणि अगरबत्ती ऑर्डर केल्या आहेत. 

वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या महामुकाबला होत आहे. या मॅचमधील विजेता संघ जगज्जेता ठरणारंय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच होणारंय. भारतानं सलग वर्ल्डकपमध्ये 10 मॅचेस जिंकल्या आहेत आता फायनल मॅच जिंकून भारत नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झालाय. भारतानं आतापर्यंत 1983 आणि 2011 साली वर्ल्डकप विजयाची किमया साधलीय. तर ऑस्ट्रेलियानं तब्बल 5 वेळा वर्ल्डकप जिंकलाय. आता ऑस्ट्रेलियाला मात देऊन वर्ल्डकपवर नाव कोरणं हेच टीम इंडियाचं लक्ष्य असेल.