विराट कोहलीच्या नेतृत्वात 3 स्टार क्रिकेटपटूंचं संपुष्टात आलं करियर

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नुकतंच आपलं कर्णधार पद सोडणार असल्याची घोषणा केली

Updated: Sep 16, 2021, 07:05 PM IST
विराट कोहलीच्या नेतृत्वात 3 स्टार क्रिकेटपटूंचं संपुष्टात आलं करियर title=

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नुकतंच आपलं कर्णधार पद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. ट्वीट करून कोहलीनं याची माहिती दिली आहे. टी 20 वर्ल्ड कपनंतर कोहली टीम इंडियाचं कर्णधार पद सोडणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली जगात सर्वात फिट व्यक्ती म्हणून ओळखला जातो. मात्र कोहली कर्णधारपदी असताना फिटनेसमुळे टीम इंडियातील 3 स्टार खेळाडूंचं क्रिकेटमधील करियर संपल्याचं सांगितलं जात आहे. 

युवराज सिंह

2007 मध्ये युवराज सिंहचा टी 20 वर्ल्डकप जिंकवून देण्यात मोठा वाटा होता. 2011 मध्ये देखील वन डे वर्ल्डकप जिंकवून देण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. युवराज सिंहने आपल्या करियरची सुरुवात सौरव गांगुली जेव्हा कर्णधार होते तेव्हापासून केली होती. इतकच नाही तर महेंद्रसिंह धोनी देखील टीम इंडियाच्या कर्णधारपदी असताना युवराज सिंहची टीममधील कामगिरी चांगली राहिली होती. 

टीम इंडियाला यशाचा शिखरावर पोहोचण्यासाठी त्याचा मोठा वाटा होता. धोनीच्या कॅप्टन्सीदरम्यान युवराजने 2007 आणि 2011 चा वर्ल्ड कप जिंकवून दिला होता. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅच देखील मिळालं होतं. मात्र कोहली कर्णधार झाल्यानंतर युवराज सिंहला आपली कामगिरी जबरदस्त दाखवण्यात अडथळे येऊ लागली. त्याला आपली चांगली कामगिरी करण्याची संधी कमी मिळाली. त्यामुळे टीम इंडियातून संन्यास घ्यावा लागला.

सुरेश रैना

महेंद्रसिंह धोनी जेव्हा कर्णधार होता तेव्हा सुरैश रैनाची कामगिरी टीम इंडियात चांगली होती. त्याने माहीसोबत स्वत:चं करियर घडवलं. धोनीच्या कॅप्टन्सी दरम्यान रैना आपल्या कामगिरीमुळे स्टार बनला. त्याने धोनीसोबत 228 सामने खेळले. मात्र कोहली कर्णधार झाल्यानंतर त्याचा निरस झाला. त्यानंतर कोहली कर्णधार असताना केवळ त्याने 26 वन डे सामने खेळले. त्यामध्येही जास्त धावा करण्यात यश मिळालं नाही. 

रविचंद्र अश्विन

रविचंद्रन अश्विन कसोटी संघातील सर्वात मोठा स्टार खेळाडू आहे. त्याने आपल्या कामगिरीनं हे स्थान कायम टिकवून ठेवलं आहे. पण वन डे आणि टी 20 मध्ये त्याचं करियर संपुष्टात आलं. धोनीच्या नेतृत्वामध्ये त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्तम कामगिरी केली होती. मात्र कोहली कर्णधारपदी आल्यानंतर त्याला 2 फॉरमॅटमध्ये विशेष संधी मिळाली नाही. अश्विनने कोहलीच्या नेतृत्वाखाली फक्त 20 एकदिवसीय सामने खेळले.  यामध्ये केवळ 25 विकेट्स घेण्यात त्याला यश मिळालं. कोहलीमुळे वन डे आणि टी 20 फॉरमॅटमधील करियर संपुष्टात आल्याची चर्चा आहे.