मुंबई : प्रत्येकाला सुखी आणि समृद्ध जीवन हवं असतं. त्यासाठी लोक विविध उपाययोजनाही करतात. त्याचबरोबर सुख-समृद्धीसाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय आणि युक्त्या सांगण्यात आल्या आहेत. यापैकी एक म्हणजे काळा धागा बांधणे. मान्यतेनुसार, शनि दोष दूर करण्यासाठी काळा धागा बांधला जातो. तसंच वाईट नजर टाळण्यासाठी तुम्ही गळ्यात, हाताला, कंबरला, पायाला किंवा मनगटावर काळा धागा बांधू शकता.
काही लोक फॅशनमुळे काळा धागा बांधतात, परंतु धर्म आणि ज्योतिषाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व खूप आहे. काळ्या धाग्याचे उपाय आणि महत्त्व ज्योतिषात सांगितलं आहे. जर तुम्हीही काळा धागा वापरत तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही गोष्टी देखील जाणून घ्याव्यात. यासोबतच काळा धागा घालताना काही नियम पाळणंही आवश्यक आहे. चला जाणून घेऊया काळा धागा घालताना कोणती खबरदारी घ्यावी.
मान्यतेनुसार, काळ्या धाग्यात वाईट नजरेपासून व्यक्तीचं रक्षण करण्याची अफाट शक्ती असते. हे वाईट शक्तींपासून व्यक्तीचं रक्षण करते. याशिवाय काळा धागा धारण केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते, असंही मानलं जातं.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)