Vastu Shastra: गरम तव्यावर चुकूनही टाकू नका पाणी, नाही तर अडचणीत होईल वाढ

वास्तुशास्त्रात घरातील वस्तू, त्या ठेवण्याचं ठिकाण यासह त्यांचा वापर याबाबत सांगितलं गेलं आहे. कधी कधी चुकीच्या पद्धतीने वस्तू ठेवल्याने अडचणीत वाढ होण्याची शक्यता असते. 

Updated: Jun 3, 2022, 07:23 PM IST
Vastu Shastra: गरम तव्यावर चुकूनही टाकू नका पाणी, नाही तर अडचणीत होईल वाढ title=

वास्तुशास्त्रात घरातील वस्तू, त्या ठेवण्याचं ठिकाण यासह त्यांचा वापर याबाबत सांगितलं गेलं आहे. कधी कधी चुकीच्या पद्धतीने वस्तू ठेवल्याने अडचणीत वाढ होण्याची शक्यता असते. तसंच कौटुंबिक कलह देखील वाढण्याची शक्यता असते. तव्यावर भाकऱ्या किंवा चपात्या केल्यानंतर तुमची एक सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. अनेकदा गरम तवा थंड करण्यासाठी त्यावर पाणी टाकलं जातं. मात्र वास्तुशास्त्रानुसार असं करणं चुकीचं आहे. त्यामुळे अडचणीत वाढ होण्याची शक्यता असते. ही कृती घरात वादविवादाला कारणीभूत ठरतात. तसेच आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो. आरोग्यविषयक समस्याही वाढण्याची शक्यता असते, असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे.गरम तव्यावर पाणी टाकल्याने घरातील सुख-समृद्धी निघून जाते. 

गरम तव्यावर पाणी टाकल्यानंतर छन असा आवाज होतो. या आवाजामुळे नकारात्मकता आकर्षित होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. नकारात्मक उर्जेमुळे घरातील लोकांवर परिणाम होते. गरम तव्यावर पाणी टाकल्यानेअनेक समस्या घरात शिरतात. त्यामुळे घरातील बिघडू लागते.

धार्मिक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की, स्वयंपाकघरात तवा कधीही उलटा ठेवू नये. असे केल्याने कुटुंबात नकारात्मकता प्रवेश करते. असेही मानले जाते की भाकरी किंवा चपाती बनवण्यापूर्वी तव्यावर मीठ शिंपडावे. असे केल्याने घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही.

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक माहिती आहे बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )