मुंबई: वृषभ राशीत वक्री असलेला बुध ग्रह मार्गस्थ झाला आहे. यामुळे राशीचक्रातील सर्वच बारा राशींवर परिणाम होणार आहे. असं असताना शुक्र ग्रह राशी बदलत वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे आधीच वृषभ राशीत असलेल्या बुध ग्रहासोबत शुक्राची युती होणार आहे. 18 जूनपासून वृषभ राशीत ही युती होणार आहे. या युतीला ज्योतिषशास्त्रात महालक्ष्मी योग म्हटलं जातं. ग्रहांच्या संयोगामुळे या अतिशय शुभ योगाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. बुध धन, बुद्धिमत्ता, व्यवसायाचा कारक आहे, तर शुक्र धन, भौतिक सुख, प्रणय यांचा कारक आहे. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांसाठी या ग्रहांची युती शुभ ठरेल.
मेष: मेष राशीच्या लोकांसाठी बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने तयार होणारा महालक्ष्मी योग जबरदस्त लाभ देईल. हा योग या लोकांना वाणी आणि आर्थिक स्थितीत लाभ देईल. मेष राशीच्या दुसऱ्या स्थानात म्हणजेच धन स्थानात ही युती होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. एकंदरीत हा काळ सर्वच बाबतीत चांगला राहील.
सिंह: या योगामुळे सिंह राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तसेच अचानक धनलाभ होईल. अडकलेले पैसे मिळू शकतात. व्यापाऱ्यांचा नफा वाढेल. देवी लक्ष्मीच्या कृपेने जीवनात सुख-समृद्धी नांदेल.
कर्क: कर्क राशीच्या लोकांना हा काळ खूप लाभ देईल. तुम्हाला पदोन्नती मिळेल, मान-सन्मान मिळेल. बुध-शुक्र यांच्या संयोगाने तयार झालेला महालक्ष्मी योग कामात यश देईल. तुम्ही ज्या योजनांवर आत्तापर्यंत काम करत होता त्या योजनांचे परिणाम दिसू लागतील. उत्पन्नात वाढ होईल. लाभदायक प्रवास होण्याची शक्यता आहे.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक माहिती आहे बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )