Parad Kada Benefits : पारा धातूचे दागिने घालणे 'या' लोकांसाठी फायद्याचे, रोग दुर करण्यासोबत अतिशय चमत्कारी गुणधर्म

या धातूचा कडा घातल्याने अनेक रोग होतात दुर... 

Updated: May 12, 2022, 05:31 PM IST
Parad Kada Benefits : पारा धातूचे दागिने घालणे 'या' लोकांसाठी फायद्याचे, रोग दुर करण्यासोबत अतिशय चमत्कारी गुणधर्म title=

मुंबई : हिंदू धर्मात काही धातूंना पवित्र मानले जाते, शिवाय रत्न, हिरे आणि मोती यांना देखील फार महत्व आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या असतील, तर त्या दूर करण्यासाठी किंवा त्या व्यक्तींवर चांगला प्रभाव राहण्यासाठी धातू परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. सोने, चांदी, तांबे इत्यादी व्यतिरिक्त आणखी एक धातू आहे. जो घालण्याचा सल्ला लोकांना दिला जातो. तो म्हणजे पारा. पारा धातूपासून देखील कडे बनवले जातात, जे हातात घालण्याचा सल्ला दिला जातो. परंतु तुम्हाला माहितीय का की, पारा कोणत्याही व्यक्तीसाठी किती फायदेशीर आहे?

धार्मिक ग्रंथांमध्ये या धातूला भगवान शंकराचे रूप मानले गेले आहे. ज्योतिष शास्त्रात त्याचे वर्णन एक जिवंत धातू म्हणून केले गेले आहे. ते हातात धारण केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. यासोबतच जीवनातील संकटांपासूनही मुक्ती मिळू शकते.

चला तर पारा धातूचे फायदे जाणून घेऊ या.

पारा धारण केल्याने फायदा होतो?

पारा हातात धारण केल्याने व्यक्तीला नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळते. त्याच वेळी, जर नकारात्मक शक्ती व्यक्तीवर वर्चस्व गाजवू लागल्या, तर ही तार धारण केल्याने व्यक्तीला या सर्व गोष्टींपासून मुक्त होते.

हात, पाय आणि पाठदुखी दूर होईल

जर एखाद्या व्यक्तीला हात, पाय आणि पाठदुखीचा त्रास होत असेल आणि सर्व उपचार करूनही आराम मिळत नसेल, तर त्याच्यासाठी पारा खूप फायदेशीर ठरू शकतो. असे मानले जाते की, पारा धातू रक्ताभिसरण नियंत्रित करण्याचे काम करते. त्यामुळे ते धारण केल्याने व्यक्तीला दुखण्यापासून आराम मिळतो.

हवामानविषयक आजार अनेकांना पटकन घेरतात. अशा स्थितीत पारा धातूचे ब्रेसलेट धारण केल्याने व्यक्तीला या सर्व समस्यांपासून लवकर आराम मिळतो.

आजच्या जीवनशैलीने माणसाला मानसिक वेदना आणि तणावाचे शिकार बनवले आहे. अशा परिस्थितीत या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी एखाद्या व्यक्तीला पारा धातूचा कडा घालण्याचा सल्ला दिला जातो. हे मानसिक वेदना दूर करते आणि ते परिधान केल्याने व्यक्ती सक्रिय होते.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)