Weekly Tarot Horoscope : श्रावणाचा पहिल्या आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोग! 'या' 4 राशींचं भवितव्य उजळणार

Weekly Tarot Horoscope Prediction 05 to 11 august 2024 in Marathi : ऑगस्टचा हा आठवडा आणि मराठी पंचांगानुसार श्रावणाचा पहिला आठवड्यात सिंह राशीमध्ये सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. हा योग संपत्ती, सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होतं. अशा परिस्थितीत, टॅरो कार्डची गणनानुसार 4 राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ आणि आनंद प्राप्त होणार आहे. टॅरो कार्ड्सपासून मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींची साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया. 

नेहा चौधरी | Updated: Aug 5, 2024, 09:45 AM IST
Weekly Tarot Horoscope : श्रावणाचा पहिल्या आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोग! 'या' 4 राशींचं भवितव्य उजळणार title=
weekly tarot horoscope prediction tarot card reading for 05 to 11 august 2024 saptahik rashi bhavishya in marathi

Weekly Tarot Horoscope Prediction 05 to 11 august 2024 in Marathi : श्रावणाचा हा पहिला आठवडा अतिशय खास आहे. या आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. सिंह राशीमध्ये बुध आणि शुक्राच्या संक्रमणामुळे हा राजयोग संपूर्ण आठवडा मजबूत स्थितीत असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार लक्ष्मी नारायण राजयोग संपत्ती, समृद्धी आणि यशाचा कारक आहे. सिंह, कन्या, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा हा आठवडा खूप फलदायी असणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि अपार आनंद देणारा आहे. चला तर मग मेष ते मीन राशीच्या सर्व राशीच्या लोकांसाठी कसा असेल श्रावणाचा पहिला आठवडा जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून (weekly tarot horoscope prediction tarot card reading 05 to 11 august 2024 saptahik rashi bhavishya in marathi)

मेष (Aries Zodiac)  

मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा दुसरा आठवडा कठीण असणार आहे. तुम्ही नवीन कामात खूप व्यस्त असणार आहात. एखाद्या नातेवाईकाच्या किंवा स्वतःच्या आजारामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी आठवडा चांगला असणार आहे. 

वृषभ (Taurus Zodiac) 

टॅरो कार्ड्सची गणनेनुसार या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांच्या सहकाऱ्यांशी समन्वय साधणे गरजेचे आहेत. तुम्ही जिव्हाळ्याच्या क्षेत्रात निराश होणार आहात. पण तुम्हाला तुमच्या अनुभवातून त्यातून मार्ग मिळणार आहे.

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांना ऑगस्टच्या या आठवड्यात कामात विलंब होणार आहे. आपण ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्या गोष्टींची कदर करणे शहाणपणाचे तुमच्यासाठी हिताच ठरेल. सरकार आणि प्रशासनाकडून तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहात. तुमच्या मुलांनाही काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac)   

ऑगस्टच्या या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांसाठी काही समस्या उद्भवणार आहेत. प्रभावाच्या कमकुवत स्थितीमुळे समस्या सोडवण्यात अडचणी येणार आहेत. त्यामुळे शॉर्टकटचा अवलंब करू नका आणि सुरक्षित मार्गाने पुढेची वाटचाल करा.

सिंह (Leo Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा हा आठवडा पैशाच्या दृष्टीने खूप चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमचे पैसे गुंतवणे हिताच ठरणार आहात. जे तुमच्यासाठी भाग्यवान ठरणार आहे. प्रियजनांच्या संपर्कात राहा. तुमच्यासाठी हा एक लाभदायक आठवडा आहे जिथे चांगल्या संधी तुमची वाट पाहत आहेत. नोकरीच्या ठिकाणी काही विशेष लाभ किंवा नवीन संधी तुम्हाला मिळणार आहे. 

कन्या (Virgo Zodiac)    

कन्या राशीच्या लोकांसाठी, या आठवड्यात तुमचा प्रभाव, करिष्मा आणि सर्जनशील प्रवृत्ती त्यांच्या शिखरावर असणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची अभ्यासाची आवड वाढणार आहे. प्रेम संबंध दृढ होणार आहे. व्यवसायात लाभ आणि प्रगतीच्या संधी मिळणार आहे. तुम्ही विजयाच्या मार्गावर पुढे जाणार आहात. 

तूळ (Libra Zodiac)  

या राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या घराच्या सुरक्षिततेसाठी ठोस व्यवस्था करावी लागणार आहे. कुटुंबातील कोणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे. प्रेम व्यक्त करण्यात घाई करू नका, हे शक्य आहे की तुम्ही ज्या भावनांना प्रेम समजता त्या फक्त आकर्षण असण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक असणार आहे. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)   

या राशीचे लोक या आठवड्यात व्यवसायात नवीन योजना राबवणार आहात. अनियमितता आरोग्यासाठी हानिकारक असणार आहे. कामाच्या ठिकाणी अडथळे येणार आहेत. योजनेनुसार कामं होणार नाहीत. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत अपेक्षित बढती मिळणार आहे. बचत वाढणार आहे. 

धनु (Sagittarius Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात व्यावहारिक आणि प्रतिष्ठित लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करणे हिताच ठरणार आहे. भावनिक होणे चांगले आहे, मात्र भावनेच्या आहारी जाऊ नका. आठवड्याचा मध्य रोमँटिक आणि प्रेमाने भरलेला असणार आहे. हा आठवड्यात घर, कौटुंबिक सुरक्षितता आणि काळजीत व्यतीत होणार आहे. 

मकर (Capricorn Zodiac)   

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसायासाठी चांगला असणार आहे. उत्साह आणि प्रयत्न तुम्हाला यश मिळणार आहे. कौटुंबिक जीवनात तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार आहे. लहान भावंडांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी संशोधनाशी संबंधित काम हे या आठवड्यातील मुख्य पैलू ठरणार आहे. शुक्रवार आणि शनिवारी महत्त्वाकांक्षी राहणे हिताच ठरेल. आर्थिक बाजू मजबूत असणार आहे. नवीन खरेदीसाठीही वेळ अनुकूल असणार आहे. नवीन फायदेशीर संबंध होणार आहेत. 

मीन  (Pisces Zodiac)  

या आठवड्यात मीन राशीच्या लोकांचे वर्तन अतिशय आक्रमक असणार आहे. वैवाहिक जीवनात काहीतरी आंबट आणि काहीतरी गोड असणार आहे. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे. गुरुवारी नातेसंबंध, संधी आणि विरोध एकाच वेळी तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)