Vivah Muhurt 2022: आषाढी एकदाशीपासून देशउठनी एकादशीपर्यंत चातुर्मासात विवाह सोहळे पार पडत नाही. चार महिने भगवान विष्णु योगनिद्रेत असतात. कार्तिकी एकादशीनंतर द्वादशीला तुळशी विवाह पार पडतो आणि लग्न पार पाडली जातात. मात्र शुक्र अस्ताला गेल्याने अजूनही शुभ मुहूर्त नाहीत. 20 नोव्हेंबरला शुक्राचा वृश्चिक राशीत उदय होणार आहे. यानंतर लग्नसोहळ्याचे मुहूर्त असणार आहेत. 2022 वर्ष संपण्यासाठी आता दीड महिन्यांचा अवधी उरला आहे. या 40 दिवसात लग्नासाठी 11 शुभ मुहूर्त आहेत. ज्या लोकांना नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत लग्न करायचं आहे. त्यांनी खाली दिलेले शुभ मुहूर्त (Vivah Muhurt) वाचा
ज्योतिषशास्त्रानुसार लग्नासाठी सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार शुभ मानले जातात. तर मंगळवारी लग्न न करण्याचा सल्ला दिला जातो. द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, एकादशी आणि त्रयोदशी तिथी लग्नासाठी शुभ आहेत. तर चतुर्थी, नवमी, चतुर्दशी तिथी विवाहासाठी अनुकूल नसतात.
-21 आणि 24 नोव्हेंबर- संध्याकाळी 3 वाजून 4 मिनिटांपासून संध्याकाळी 7 वाजून 37 मिनिटांपर्यंत
-25 आणि 26 नोव्हेंबर- रात्री 10 वाजून 45 मिनिटांपासू सकाळी 6 वाजून 52 मिनिटांपर्यंत
-27 नोव्हेंबर- रात्री 9 वाजून 34 मिनिटं ते सकाळी 6 वाजून 54 मिनिटांपर्यंत
-28 नोव्हेंबर- सकाळी 6 वाजून 54 मिनिटांपासून सकाळी 10 वाजून 20 मिनिटांपर्यंत
Mangal Gochar 2022: तीन दिवसानंतर या राशींचं नशिब पालटणार! मंगळाची कृपा होणार
-2 आणि 3 डिसेंबर- सकाळी 7 वाजून 30 मिनिटांपासून सकाळी 6 वाजून 58 मिनिटांपर्यंत
-7 आणि 8 डिसेंबर- रात्री 8 वाजून 46 मिनिटांपासून सकाळी 7 वाजून 1 मिनिटांपर्यंत
-9 डिसेंबर - सकाळी 7 वाजून 2 मिनिटांपासून दुपारी 2 वाजून 59 मिनिटापर्यंत
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)