Mangal Gochar 2022: तीन दिवसानंतर या राशींचं नशिब पालटणार! मंगळाची कृपा होणार

Mangal Gochar 2022: मंगळ ग्रह सध्या मेष राशीत वक्री स्थितीत असून तीन दिवसानंतर वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत देखील मंगळ वक्री (Mangal Vakri) अवस्थेत असणार आहे. 13 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजून 32 मिनिटांनी गोचर करणार आहे. 

Updated: Nov 10, 2022, 04:58 PM IST
Mangal Gochar 2022: तीन दिवसानंतर या राशींचं नशिब पालटणार! मंगळाची कृपा होणार title=

Mangal Gochar 2022: मंगळ ग्रह सध्या मेष राशीत वक्री स्थितीत असून तीन दिवसानंतर वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत देखील मंगळ वक्री (Mangal Vakri) अवस्थेत असणार आहे. 13 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजून 32 मिनिटांनी गोचर करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ हा सर्वात उग्र ग्रह मानला जातो. मंगळ व्यक्तीला शारीरिक शक्ति, तग धरण्याची क्षमता, इच्छाशक्ती, काहीही करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा प्रदान करतो. मंगळाच्या प्रभावाखाली असलेले लोक धैर्यवान आणि मेहनती असतात. वक्री मंगळाच्या गोचरामुळे (Mangal Gochar) वृषभ राशीचे लोक स्वभावाने थोडे चिडचिडे आणि अचानक रागावू शकतात. तसेच या स्थितीचा पाच राशींना करिअर, व्यापाऱ्यात फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात पाच राशी कोणत्या आहेत...

वृषभ - वृषभ राशीसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. या राशीतच मंगळ वक्री अवस्थेत आहे. व्यवसायासाठी उत्तम काळ आहे. कुंटुंब आणि भावाचे उत्तम सहकार्य मिळेल. घरामध्ये धार्मिक कार्यक्रम होतील. नोकरीत बदल, नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जीवनात आनंद वाढेल. वैवाहिक जीवन चांगले राहील.

तूळ - मंगळ गोचर आणि वक्री स्थिती तूळ राशीच्या लोकांना खूप लाभदायी ठरेल. धनलाभ होईल. पदोन्नती आणि  पगार वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर व्यवसायात नफा होईल. शिक्षक, मार्केटिंग व्यावसायिक आणि मीडियातील लोकांना खूप फायदा होईल.

वृश्चिक - मंगळाचा गोचर आणि वक्री स्थिती या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढवेल. जीवनात सुख-सुविधा वाढतील. कामात बदल होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी आनंददायी वातावरण असेल.

Kaal Bhairav Jayanti: या दिवशी कालभैरव जयंती, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

कुंभ - मंगळाची गोचर स्थिती कुंभ राशीच्या लोकांना शुभ फळ देईल. धन-संपत्ती वाढेल. नवीन घर आणि जमीन खरेदी करू शकता. जीवनात सुख-सुविधा वाढतील. कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल.

मकर - या राशीसाठीही ही स्थिती चांगली ठरेल. गोचर आणि वक्री स्थिती प्रेम जीवन आणि करिअरमध्ये लाभ देईल. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. परीक्षा-स्पर्धेत यश मिळू शकेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)