Shukra Gochar 2023 : फक्त 2 दिवस! यंदा शुक्र गोचरमुळे सुख नाही तर कोसळणार दुःखाचा डोंगर

Shukra Gochar 2023 Effect : विलास, सुख आणि संपत्तीचा कारक शुक्र ग्रह जेव्हा आपली स्थिती बदलतो तेव्हा अनेक राशींवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. मात्र शुक्रवारी होणाऱ्या शुक्र गोचरमुळे काही राशींच्या आयुष्यात दुःखाचं डोंगर कोसळणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 5, 2023, 09:49 AM IST
 Shukra Gochar 2023 : फक्त 2 दिवस! यंदा शुक्र गोचरमुळे सुख नाही तर कोसळणार दुःखाचा डोंगर title=
venus transit in cancer 07 july 2023 friday These zodiac signs will face difficulties Shukra Gochar 2023

Venus Transit in Cancer in July 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांची एक खासियत असते. त्यातील महत्त्वातील शुक्र ग्रह येत्या दोन दिवसात आपली स्थिती बदलणार आहे. तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र गोचर होणार म्हटलं की जाचकांला आनंद होतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीत कुठल्या घरात आहे यावर तुमचं वैभव, विलास आणि भौतिक सुख अवलंबून असतं. कारण शुक्र ग्रह हा ऐश्वर्य आणि भौतिक सुखाचा कारक आहे. 

येत्या शुक्रवारी दोन दिवसांनी 7 जुलैला शुक्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत पुढील 7 ऑगस्टपर्यंत तो राहणार आहे. शुक्र गोचरनंतर साधारण 15 दिवसांनी तो उलटी चाल करुन पुन्हा कर्क राशीत परतणार आहे. वैभवाचा कारक मात्र यंदा काही राशींच्या आयुष्यात दु:खात डोंगर घेऊन येणार आहे. एक महिना या राशीच्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.  या राशीच्या वैयक्तिक आयुष्यात आणि करिअरमध्ये अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागणार आहे. (venus transit in cancer 07 july 2023 friday These zodiac signs will face difficulties Shukra Gochar 2023)

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर अशुभ ठरणार आहे. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी संयम बाळगा अन्यथा मोठं नुकसान होण्याची भीती आहे. जोडीदारासोबतही वादविवाद होणार आहे. त्यामुळे कुटुंबात अशांतता पसरणार आहे. शारीरिक किंवा मानसिक त्रासाचा सामना करावा लागेल. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च होणार आहे. 

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांना एक महिने खूप सावध राहवं लागणार आहे. तुमचा विश्वासघात होण्याचा मोठा धोका आहे. आरोग्याची समस्या उद्ध्भवणार आहे. बिझनेसमध्ये मोठ्या फटका बसणार आहे. कार्यक्षेत्रात बॉसशी वाद होणार आहे. प्रवास आणि बाहेरचं खाणं टाळा. करिअरमध्ये अनेक आव्हाणांचा सामना करावा लागेल. 

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांना एक महिना करिअरमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कठोर मेहनत करुनही तुम्हाला त्याचं फळं मिळणार नाही. होणारी कामंही बिघडणार आहे. व्यावसायिकांना अनेक प्रॉब्लेमशी डील करावी लागणार आहे. ज्या व्यक्तीजवळ तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगता तोच व्यक्ती तुम्हाला मोठ्या अडचणीत टाकणार आहेत. पोटाचा विकार त्रासदायक ठरणार आहे. या काळात कुठलाही आर्थिक व्यवहार करु नका.

हेसुद्धा वाचा - Shukra Vskri : शुक्र 'या' राशीच्या लोकांना बनवेल श्रीमंत, 'या' दिवसापासून तिजोरीवर 7 ऑगस्टपर्यंत लक्ष्मीची कृपा

 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )