Budh-Shukra Gochar: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपल्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी नोव्हेंबर महिन्यात अनेक प्रमुख ग्रहांच्या स्थितीतील बदल होणार आहेत. हे बदल काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकतात. विशेष म्हणजे नोव्हेंबरमध्ये बुध आणि शुक्र हे राजकुमार ग्रह दोनदा आपली राशी बदलतील.
ज्योतिष्य शास्त्रानुसार, 3 नोव्हेंबरला शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर 30 नोव्हेंबरला शुक्र आपली राशी बदलून तूळ राशीत जाणार आहे. दुसरीकडे बुध ग्रह 6 नोव्हेंबरला वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि 27 नोव्हेंबरला धनु राशीत प्रवेश करणार आहे. या दोन्ही ग्रहांचा दोन वेळा होणारं गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी फार लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचे सकारात्मक परिणाम मिळणार आहेत.
नोव्हेंबरमध्ये शुक्राचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. पैशाची आवक वाढणार आहे. सकारात्मक वातावरण निर्माण होईल. कुटुंबातील सर्व समस्या दूर होऊ शकणार आहेत.
बुध मिथुन राशीचा अधिपती ग्रह आहे. अशा स्थितीत मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाच्या राशीतील बदलामुळे शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. आर्थिक लाभाचे अंदाज आहेत. बुध गोचराच्या प्रभावामुळे तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.
कन्या राशीच्या लोकांसाठी बुध राशीतील बदल खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम मिळतील. तुम्हाला मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो. धार्मिक संगीतात रुची वाढू शकते. मान-सन्मानात वाढ होईल. अनेक अडचणींवर मात करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्र शुभ राहणार आहे. शुक्राच्या प्रभावामुळे तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. शेअर बाजारात किंवा अन्य माध्यमातून पैसे गुंतवले आहेत त्यांनाही आर्थिक फायदा होऊ शकतो. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. पैसे कमावण्याचे साधन बनू शकते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )