Guru Chandal Yog: राहू गोचरमुळे गुरु चांडाळ योग संपला; 'या' राशींच्या लोकांची होणार चांदी

Rahu Gochar in Meen 2023: गुरु चांडाळ योग हा फार अशुभ मानला जातो. या योगाच्या समाप्तीमुळे काही राशींचे भाग्य चमकू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगतीची शक्यता आहे.

सुरभि जगदीश | Updated: Nov 1, 2023, 10:30 AM IST
Guru Chandal Yog: राहू गोचरमुळे गुरु चांडाळ योग संपला; 'या' राशींच्या लोकांची होणार चांदी title=

Rahu Gochar in Meen 2023: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी 30 ऑक्टोबर रोजी मायावी ग्रह राहू मेष सोडून मीन राशीत प्रवेश केला आहे. राहूच्या गोचरमुळे गुरु चांडाळ योग संपुष्टात आला आहे. 

गुरु चांडाळ योग हा फार अशुभ मानला जातो. या योगाच्या समाप्तीमुळे काही राशींचे भाग्य चमकू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगतीची शक्यता आहे. जाणून घेऊया गुरु चांडाल योग संपुष्टात आल्यामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. 

मेष रास (Aries Zodiac)

गुरु चांडाळ अशुभ योगाच्या समाप्तीमुळे तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत. यामुळे तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात तणावाचा सामना करत होता, आता तुम्हाला त्यातून आराम मिळणार आहे. तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. राहूच्या गोचरमुळे शुभ परिणाम तुमच्या करिअर आणि व्यवसायात दिसतील. आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला आर्थिक बाबतीतही फायदा होईल. तुम्हाला भागीदारीच्या कामात फायदा होईल. तुम्हाला नोकरीशी संबंधित काही नवीन प्रस्ताव मिळू शकतात.

मिथुन रास (Mithun Zodiac)

गुरु चांडाळ योग समाप्त झाल्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या घरात हा योग तयार होत होता. त्यामुळे तुमचे उत्पन्न तुमच्या इच्छेप्रमाणे नव्हतं. मात्र आता तुमचे उत्पन्न वाढणार आहे. तुम्हाला करिअरच्या दृष्टीने अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात. मुलांशी संबंधित काही बातम्या मिळू शकतात. ऑफिसमध्ये तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो.

कन्या रास (Kanya Zodiac)

गुरु चांडाळ योग संपल्याने करिअर आणि व्यवसायात चांगले लाभ मिळू शकणार आहेत. तुमची तब्येत सुधारेल. तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये भरपूर लाभ मिळतील. तुम्हाला व्यवसायात चांगला परतावाही मिळेल. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. काही प्रकरणांमध्ये तुम्हाला अनपेक्षित नफा मिळण्याची अपेक्षा आहे. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येण्याची शुभ शक्यता आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )