Vastu Tips : चुकूनही या गोष्टी घराच्या मंदिरात ठेवू नका; नाहीतर होऊ शकते नुकसान

घराच्या मंदिराशी संबंधित देखील वास्तुशास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत.

Updated: Jan 13, 2022, 04:55 PM IST
Vastu Tips : चुकूनही या गोष्टी घराच्या मंदिरात ठेवू नका; नाहीतर होऊ शकते नुकसान title=

मुंबई : जवळजवळ प्रत्येक लोकांच्या घरात मंदिर हे असतंच. ज्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते. ज्या घरात मंदिर आहे तिथे देव वास करतो अशी मान्यता आहे. घरातील मंदिर नेहमी स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आपलं घर सुख, समृद्धीनं नांदण्यासाठी वास्तुशास्त्राचं महत्व सर्वात जास्त असतं असे म्हणतात. त्यामुळे बरेच लोकं घरातील सगळ्या गोष्टी करण्यापूर्वी वास्तुशास्त्राविषयी माहिती घेतात.

घराच्या मंदिराशी संबंधित देखील वास्तुशास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम लोकांनी पाळले तर त्याचा त्यांना खूप फायदा होईल असे देखील वास्तुशास्त्रात म्हटले आहे.

- गणेशाची मूर्ती घरातील मंदिरात असावी. मात्र, जेव्हाही तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात गणेशाची मूर्ती ठेवाल, तेव्हा ती मूर्ती तुटलेली नाही हे पाहा. असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते.

- घरातील मंदिरातील गणपतीच्या मूर्तींची संख्या 3, 5, 7 किंवा 9 या विषम संख्येत नसावी. घरातील मंदिरात गणेशाच्या दोन मूर्ती ठेवता येतात. या मूर्ती अशा प्रकारे एकत्र ठेवाव्यात की त्यांचे तोंड नेहमी उत्तरेकडे असावे. गणेशाच्या मूर्ती समोरासमोर ठेवू नयेत.

पूजा घरासाठी वास्तु टिप्स

- जर तुम्ही घरातील मंदिरात शिवलिंग ठेवत असाल तर लक्षात ठेवा की, शिवलिंगाचा आकार फार मोठा नसावा, तुमच्या पूजाघरात नेहमी लहान आकाराचे शिवलिंग ठेवावे आणि या शिवलिंगाला रोज जल अर्पण करावे.

- मंदिरात किमान पाच देवतांच्या मूर्ती ठेवाव्यात. कारण वास्तुशास्त्रात या अंकांना खूप शुभ मानले गेले आहे. पाच देवतांच्या मूर्तींपैकी किमान एक तरी देवीची मूर्ती ठेवावी.

- घरातील मंदिरात नेहमी कृष्णासोबत राधाची मूर्ती ठेवा. एकट्या कृष्णाची मूर्ती कधीही ठेवू नका किंवा राधा-कृष्णाची मूर्ती एकमेकांपासून दूर ठेवू नका.

- पूजेच्या वेळी तांदूळ नक्कीच वापरा. देवाला तांदूळ अर्पण करताना तुटलेले तांदूळ वाहू नये याची विशेष काळजी घ्या.

- पूजेच्या वेळी देवासमोर जो दिवा लावावा, तो पूर्णपणे योग्य असावा आणि तो कोणत्याही ठिकाणाहून तोडू नये. त्याचप्रमाणे तुम्ही देवाला अर्पण केलेली फुलेही अतिशय स्वच्छ असावीत.

(टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)