When Should We Clean Devghar: हिंदू धर्मानुसार (Hindu Spirituality) रोज सकाळ-संध्याकाळ देवांची पूजा करण्याची प्रथा आहे. देवांची विधिवत पूजा करुन प्रार्थना व स्त्रोत्र म्हणणे हे शास्त्रात सांगितलं आहे. घरात जागेची कमतरता असल्यास एका भागात छोटे देवघर (God Devghar) बनवले जाते. तर, मोठे घर असल्यास एका खोलीतच पुजेची खोली करण्यात येते. घरात असलेले छोट्याश्या देवघरामुळंही सकारात्मकता नांदते. तर, रोज पूजा-अर्चना केल्यामुळं देवांची कृपा बरसते. ज्या प्रमाणे पूजापाठ करण्याचे नियम असतात त्याप्रमाणे देवघरात कोणते सामान ठेवावे व देवघराची काळजी कशी घ्यावी, याचेही काही नियम आहेत. शास्त्रानुसार या नियमांचे पालन केल्यास घरात सुख, समृद्धी नांदते तसंच, घरात सकारात्मकता राहते. (When Should We Clean Devghar)
देवघराची साफ सफाई करण्यासाठी वास्तु शास्त्रात शुभ आणि अशुभ दिवस सांगण्यात आले आहेत. आठवड्यातील या दिवशी देवघराची साफसफाई केल्यास घरात धन- संपत्ती, समृद्धी वाढते. घरातील सदस्य यशस्वी होतात. तर, अशुभ दिवशी देवघराची साफसफाई केल्यास घरात गरिबी व संकटे येतात. ज्योतिष शास्त्रानुसार देवघराची साफ-सफाई रोजच केली पाहिजे. तसंच, रोज पूजादेखील करण्यात यावी. मात्र, आठवड्यातील शनिवार या दिवशी देवघराची पूजा करावी. असं केल्याने घरात नकारात्मक उर्जा येत नाही व. घरात आर्थिक तंगीदेखील दूर होते. जर तुम्ही शनिवारी देवघराची साफ-सफाई केलीच तर त्यानंतर गंगाजलचा वापर करावा.
गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी घरातील देवघराची साफ-सफाई करणे टाळा. या दिवशी देवघर स्वच्छ केल्याने घरात दारिद्र आणि कष्ट झेलावे लागतात. अशातच घरात राहणाऱ्या लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागते. त्याचवेळी रात्री चुकुनही देवघराची स्वच्छता करु नका. असं केल्यास देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो आणि देवी लक्ष्मीच्या क्रोधामुळं आर्थिक फटका तुम्हाला बसू शकतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )