Vastu Tips : घरात कोणत्या मार्गानं येणारा सुर्यप्रकाश ठरतो लाभदायक, जो क्षणात उजळवतो तुमचं भाग्य

Vastu Shastra :  वास्तू (Vastu) आणि सूर्य (Sun) यांचं अनोखं नातं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा घर विकतं घेतो किंवा एखाद घर राहण्यासाठी शोधतो तर पहिले पाहतो घरात किती सुर्यप्रकाश येतो आहे ते...ज्या घरात अधिक सूर्यप्रकाश येतो त्या घराचं भाग्य उजळतं असं म्हटलं जातं. 

Updated: Nov 29, 2022, 11:15 AM IST
Vastu Tips : घरात कोणत्या मार्गानं येणारा सुर्यप्रकाश ठरतो लाभदायक, जो क्षणात उजळवतो तुमचं भाग्य title=
Vastu Tips Sun And Vastu rules and Which way the sunlight coming in the house is beneficial happy home and Bright Future nmp

Sun And Vastu :  जीवनात सकारात्मक वातावरण असलं तर तुमचं भाग्य प्रकाशमय होतं. जीवनात कायम एका प्रकाशाची गरज असते...म्हणजे तुमचं ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक उर्जा (Positive energy) हवी असते. जर तुमच्या आजूबाजूचं वातावरण चांगलं आणि सकारात्मक असेल तर तुमचं कामात मनं रमतं. जर काम चांगलं झालं तर तुमचं भाग्य बदलतं आणि जर तुमचं भाग्य बदललं तर तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते (happiness and prosperity in the house). जेव्हा आपण घर बघायला जातो तर अनेक वेळा घरात येणारा सूर्यप्रकाश (sunshine) किती आहे हे पाहतो. यांच्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? वास्तूशास्त्रात सूर्यला विशेष महत्त्व आहे. ज्या घरात सूर्यप्रकाश अधिक त्या घरातं नशिब उजळणार असं मानलं जातं. त्यामुळे तुमच्या घरात कोणत्या मार्गानं सुर्यप्रकाश येतो जो तुमच्यासाठी लाभदायक ठरणार त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. (Vastu Tips Sun And Vastu rules and Which way the sunlight coming in the house is beneficial happy home and Bright Future)

1. ब्रम्ह मुहूर्त पहाटे 3 ते 6 - यावेळी घरच्या उत्तर पूर्व भागात सूर्य असतो. म्हणून वास्तूशास्त्रानुसार घरातील देवघर हे ईशान्य दिशेला असावे. 

2. सकाळी 6 ते 9 च्या दरम्यान - दरम्यान सूर्य पूर्व दिशेला असतो त्यामुळे घराच्या खिडक्या या पूर्व दिशेला असाव्यात. या वेळेमध्ये घराची दारं आणि खिडक्या बंद ठेवू नका. पडदे असतील तर ते उघडा सूर्यप्रकाशाने तुमचं घर न्हावून निघू द्या. 

3. सकाळी 9 ते 12 दरम्यान - यावेळी सूर्य हा घराच्या आग्नेय दिशेला असतो. म्हणजे ही वेळ तुमच्या स्वयंपाकाची असते. त्यामुळे स्वयंपाक घर हे आग्नेय दिशेला असावे असं वास्तूशास्त्रात सांगितलं आहे. 

हेही वाचा -  Astro Tips : चपाती करताना चुकूनही करु नका या गोष्टी, नाही तर अन्नपूर्णासोबतच महालक्ष्मी होईल नाराज

4. दुपारी 12 ते 3 दरम्यान - यावेळेमध्ये घरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आणि गृहिणी या आराम करतात. यावेळी सूर्य हा माथ्यावर आलेला असतो. यावेळामध्ये सूर्यातून प्रखर अल्ट्राव्हायोलेट किरणं बाहेर पडतं असतात. त्यामुळे या वेळेमध्ये दाराचं आणि खिडक्यांचे पडदे लावून घ्या. 

5. दुपारी 3 ते 6 दरम्यान - यावेळेमध्ये सूर्य हा नैऋत्य भागात असतो. या वेळेमध्ये अनेक जण वाचन करतात तर लहान मुलं अभ्यास करतात. त्यामुळे वास्तूशास्त्रानुसार या दिशेला तुमची स्टडी रुम किंवा लायब्ररी असावी. 

6.  7 च्या आत जेवा - आरोग्यतज्ज्ञांपासून वास्तूशास्त्र तज्ज्ञ सांगतात की 7 च्या जेवण करणे हे आरोग्यासाठी चांगल आहे. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी घरातील पश्चिम दिशेला बसून जेवून घ्यावे असं सांगण्यात आलं आहे. कारण सूर्यास्तानंतर आजार पसरवणारे कीटकांचं साम्राज्य पसरतं. 

7. बेडरुम या दिशेला हवं  - जरी रात्री झोपताना सूर्य मावळलेला असला तरी तो सकाळी उगवणार म्हणून जर तुमची सकाळ सकारात्मक करायची असेल तर घरात पश्चिम दिशेला बेडरुम असावं. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)