Vastu Tips : घरात सुख-समृद्धी नांदत नाही, तसंच आर्थिक समस्याही (Financial Problems) कायम राहतात असे अनेक प्रश्न अनेक जण कायम विचारताना दिसतात. या गोष्टींकरिता काही जण ज्योतिषशास्त्र (Jyotish shastra), वास्तुशास्त्र (Vastu shastra) अभ्यासकांचा सल्ला घेतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही मूर्ती (Idols) ठेवल्यास घरात सुख-समृद्धी कायम राहते, आर्थिक समस्या दूर होतात, असं जाणकारांचं मत आहे. या विशेष मूर्तींमुळे घरातलं वातावरण सकारात्मक (Positive) राहतं.
कासव - वास्तू तज्ज्ञांच्या मते, काही मूर्ती अशा आहेत ज्या व्यक्तीचे भाग्य बदलतात. या मूर्तींना लकी चार्म असेही म्हणतात. यामध्ये कासवाच्या (turtle) पुतळ्याचा समावेश आहे. असे मानले जाते की कासवाची मुर्ती (statue of a turtle) घरात ठेवल्याने व्यक्तीला कधीही संपत्ती आणि वैभवाची कमतरता भासत नाही. ड्रॉईंग रूममध्ये ठेवल्यास त्याचा विशेष फायदा होतो.
चांदीचा हत्ती- वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या घराच्या सजावटीसोबतच कुटुंबासाठी फायदेशीर आहेत. यापैकी एक हत्ती (elephant) किंवा चांदीचा हत्ती आहे. त्यांना घरात ठेवल्याने लक्ष्मीचा (Mata Lakshmi) वास होतो. त्यांना घरात ठेवल्याने व्यक्तीची आर्थिक समस्या दूर होते. तसेच घरात चांदी (silver) किंवा पितळेचा (coper) हत्ती ठेवणे शुभ मानले जाते.
वाचा : Mumbai Indians च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, Head coach पदी 'या' विश्वविक्रमी खेळाडूची निवड
मासा - वास्तूमध्ये माशांच्या (fish) बाबतीतही अनेक समजुती आहेत. वास्तूनुसार, व्यक्तीला घरात चांदी किंवा पितळी (silver and brass) मासे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. घरात ठेवल्याने घरात प्रगती होते. ते ठेवताना लक्षात ठेवा की माशाचे तोंड ईशान्य दिशेला असावे. त्यामुळे घरात शांततेचे वातावरण आहे. आनंद येतो आणि पैशाची कमतरता नसते.
हंस मूर्ती- हंस मूर्ती घरात सकारात्मकता आणते. घरात ठेवल्याने आर्थिक लाभ होतो. एवढेच नाही तर वैवाहिक जीवनासाठीही हे शुभ मानले जाते. काही वास्तू तज्ञ हे बेडरूममध्ये ठेवण्याचा सल्ला देतात. शयनगृहात हंसाची जोडी ठेवल्याने पती-पत्नीमध्ये प्रेम टिकून राहते असे म्हणतात. तसेच घरात ठेवल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. तसेच व्यक्तीसाठी प्रगतीचा मार्ग खुला होतो.